शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

फिक्कीमधील मोदींच्या भाषणाविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 10:53 PM

नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीच्या दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्यानं काँग्रेस पक्ष बिथरला आहे.

नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीच्या दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्यानं काँग्रेस पक्ष बिथरला आहे. त्यामुळे काँग्रेसनंही भाजपावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं पलटवार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या विरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्याचं एफआयआर केलं आहे.निवडणूक आयोगानं काँग्रेसला नोटीस पाठवल्यानंतर अहमद पटेल, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाल्यांसह अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरात अध्यक्ष जीतू वाघानी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगानं अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करत चॅनेल्सविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे आचारसंहितेचाच भंग केला आहे, निवडणूक आयोगावर असा आरोप काँग्रेसनं केला आहे.राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ही मुलाखत प्रसारित करणाऱ्या स्थानिक गुजराती वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. राहुल गांधी यांची मुलाखत काही गुजराती वाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या मुलाखती प्रसारित करण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांना 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून करण्यात येऊ शकतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस