समय रैनाचा शो इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये (India's Got Latent) रणवीर अलाहाबादियाने 'आई-वडिल' यांच्या इंटीमेट लाइफबद्दल एक वादग्रस्त विधान केले. या वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर आता यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनासह 5 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर 'अश्लीलतेला' प्रोत्साहन देण्याचा आरोप करत गुवाहटीमध्ये गुन्हा दाखल करणात आला आहे.
आसमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर एक पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यात, आज गुवाहटी पोलिसांनी काही यूट्यूबर्स आणि सोशल इन्फ्लुएंसर्स यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे म्हणण्यात आले आहे. यात आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्व मुखर्जी, रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैना आदींचा समावेश आहे.
या कलमांखाली गुन्हा दाखल -सीएम पुढे म्हटले, "इंडियाज गॉट लॅटेंट शोमध्ये अश्लीलतेला उत्तेजन देणे आणि लैंगिक तथा अश्लील चर्चेत सहभागी असणे, यासाठी, गुवाहटी क्राइम ब्रांचने सायबर पीएस केस संख्या 03/2025 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीएनएस 2023 चे 79/95/294/296, आयटी अॅक्ट, 2000 चे कलम 67, सिनेमॅटोग्राफ अॅक्ट 1952 चे कलम 4/7, महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व (निषेध) अधिनियम, 1986 चे कलम 4/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आणखी तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण -पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियाने इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये एक वादग्रस्त विधान केले आहे. त्याने आई-वडिलांच्या इंटीमेट लाइफवर प्रश्न विचारला होता. यानंतर तो प्रचंड ट्रोल होत आहे. यासंदर्भात त्याने माफीही मागितली आहे. मात्र, असे असूनही त्याच्या अडचणी वाढतच आहेत.