शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

2000 रुपयांच्या नोटा बंद होणार?; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 9:27 PM

बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे.

ठळक मुद्दे बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे.बँका एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून त्यांच्या जागी 500 रुपयांच्या नोटा टाकत असल्याची माहिती समोर आली होती.बँकांना अशा प्रकारची कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

नवी दिल्लीः नोटाबंदीनंतर अनेकांना पैशांचा तुटवडा जाणवला होता. त्यानंतर मोदी सरकारनं पुन्हा 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात उपलब्ध करून दिल्या. आता त्यातील 2000च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे. बँकांना अशा प्रकारची कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बँका एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून त्यांच्या जागी 500 रुपयांच्या नोटा टाकत असल्याची माहिती समोर आली होती. बिजनेस स्टँडर्डनं याची माहिती दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 2000च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. देशातील जवळपास 2 लाख 40 हजार एटीएममध्ये 2000च्या जागी 500 नोटा टाकण्याचा हा बदल करावा लागणार आहे.एटीएममध्ये साधारणतः 2000, 500, 200 आणि 100 च्या नोटा उपलब्ध आहेत. यात बदल केल्यानंतर 2000च्या नोटा मिळणार नाहीत. गेल्या वर्षीपासून 500च्या नोटांनी व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं असून, 2000च्या नोटा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु 2000च्या नोटा थेट बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तर दुसरीकडे 500 रुपयांच्या नोटा वाढवत हळूहळू 2000च्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचाही मोदी सरकारच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे. तसेच काही बँकांनी ग्राहकांना 1 मार्चपासून एटीएममधून 2000च्या नोटा येणार असल्याचे सूतोवाच केले आहेत.