नीरव मोदीला पळून जाण्यास अर्थमंत्रालयानेच मदत केली - स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 05:42 IST2019-03-20T05:42:22+5:302019-03-20T05:42:43+5:30
पंजाब नॅशनल बँकेला फसवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला परदेशात पळून जाण्यास अर्थमंत्रालयाने मदत केली, असा आरोप भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

नीरव मोदीला पळून जाण्यास अर्थमंत्रालयानेच मदत केली - स्वामी
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला फसवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला परदेशात पळून जाण्यास अर्थमंत्रालयाने मदत केली, असा आरोप भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. अर्थमंत्रालय दक्ष राहिले असते, तर नीरव मोदी देशाबाहेर पळूनच जाऊ शकला नसता, असे ते म्हणाले.
नीरव मोदी परदेशात पळून गेला, याला अर्थमंत्रालयच जबाबदार आहे. तेथील लोकांनी त्याच्याकडून सोन्याची बिस्किटे घेतली, असा गंभीर आरोप करून ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले, पण अर्थमंत्रालयामुळे ते शक्य झाले नाही. स्वामी यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, पण स्वामी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अजिबात पटत नाही, हे सर्वज्ञात आहे.