अखेर ‘ती’ पाकमधून भारतात परतणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:21 IST2025-08-03T13:18:37+5:302025-08-03T13:21:04+5:30

तिने जम्मू-काश्मिरातील एका सरकारी अधिकाऱ्यासोबत लग्नही केलेले असून, या दाम्पत्यास मुले व नातवंडे आहेत.

Finally she will return to India from Pakistan | अखेर ‘ती’ पाकमधून भारतात परतणार !

अखेर ‘ती’ पाकमधून भारतात परतणार !

सुरेश एस डुग्गर -

जम्मू  :   पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानात पाठविण्यात आलेली ६३ वर्षीय महिला रक्षंदा राशीद हिला अतिथी व्हिसा (व्हिजिटर व्हिसा) देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यामुळे ही महिला पुन्हा जम्मू-काश्मीरला आपल्या कुटुंबाकडे परतणार आहे. 

भारत सरकारच्या वतीने जम्मू-काश्मीर व लदाख उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली आहे. मूळची पाकिस्तानची असलेली ही महिला व्हिसाच्या आधारे भारतात राहत होती. तिने जम्मू-काश्मिरातील एका सरकारी अधिकाऱ्यासोबत लग्नही केलेले असून, या दाम्पत्यास मुले व नातवंडे आहेत. ती जम्मूतील तालाब खटिका भागातील रहिवासी आहे. 
 

Web Title: Finally she will return to India from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.