शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

...तर मोदी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल, अखेर लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 11:03 IST

अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे सरकारला मणिपूरच्या घटनेवर दीर्घ चर्चेला भाग पाडले जाईल

नवी दिल्ली - मणिपूरच्या घटनेवरून संसदेत सुरु असलेल्या गोंधळात आता विरोधी पक्षाच्या आघाडीने मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. अखेर, विरोधकांच्यावतीने केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेसखासदार गौरव गोगई यांनी आज लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे, लोकसभा सभापतींनी प्रस्ताव स्वीकारुन आदेश दिले. तर, मोदी सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करावं लागू शकते. दरम्यान, केवळ जिंकण्यासाठीच हा प्रस्ताव आणला जात नसून सरकारच्या हुकूमशाहीविरुद्ध हा आवाज उठवण्यात आल्याचंही काँग्रेसने यावेळी म्हटलंय. 

अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे सरकारला मणिपूरच्या घटनेवर दीर्घ चर्चेला भाग पाडले जाईल आणि त्यादरम्यान पंतप्रधानांना जबाबदार धरले जाईल असं INDIA आघाडीच्या नेत्यांना वाटते. विरोधी पक्षाच्या आघाडीतील नेत्यांनी या अविश्वास प्रस्तावाला सहमती दिली आहे. कमीत कमी ५० खासदारांच्या स्वाक्षरीचे अभियान यापूर्वीच सुरूही झाले होते. आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, खासदार गौरव गोगई यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला. तसेच, बीआरएस खासदार नमा नागेश्वर यांनीही केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे, गरजेच्या संख्याबळानुसार खासदारांच्या सह्या झाल्यानंतर लोकसभा सभापतींकडून तो प्रस्ताव दाखल करुन घेतला जाईल. त्यानंतर, सभापतींनी निर्देश दिल्यानंतरच मोदी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे, बहुमत सिद्ध करण्याची वेळ सरकारवर येऊ शकते.  

अधी रंजन चौधरी म्हणाले

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकारवर लोकांचा विश्वास उठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर बोलावे अशी आमची मागणी आहे. परंतु पंतप्रधान कुणाचे ऐकत नाहीत. ते सभागृहाच्या बाहेर बोलतात आणि सभागृहात नकार देतात. पंतप्रधानांनी आमच्याकडे लक्ष द्यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही त्यामुळे आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणणे योग्य वाटतेय, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून आणला अविश्वास प्रस्ताव

अविश्वास प्रस्ताव प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी आणला जात नाही. कशाप्रकारे देशात हुकुमशाही सरकार चालतंय आणि विरोधी पक्षांना अपमानित केले जातेय हे जनतेला कळायला हवे. आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याची वेळ का आली हा खरा प्रश्न आहे असेही काँग्रेसने म्हटलं आहे. तर भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर पलटवार केला. ज्या विरोधकांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला आहे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कितीही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार केला तरी काही बदलणार नाही. जनतेने वारंवार नाकारल्याने स्वत:वरील विश्वास गमावला आहे. त्यामुळे INDIA नाव ठेवल्याने जनतेचा विश्वास मिळाला असता तर ईस्ट इंडिया कंपनी कधी पळाली नसती असंही प्रधान यांनी म्हटलं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाMember of parliamentखासदारcongressकाँग्रेसNo Confidence motionअविश्वास ठराव