अखेर वारक-यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर

By Admin | Updated: June 8, 2016 01:50 IST2016-06-08T01:50:41+5:302016-06-08T01:50:41+5:30

पुणे: आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणा-या दिंड्यांना अखेर सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Finally, the gas cylinders at a discounted price to Warak | अखेर वारक-यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर

अखेर वारक-यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर

णे: आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणा-या दिंड्यांना अखेर सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्र शासनाने गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलिंडरसाठी देण्यात येणारे अनुदान थेट संबंधित ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनुदान जमा होणारे प्रत्येक बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे गत वर्षी पासून आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणा-या दिंड्यांना मिळणा-या गॅस सिलिंडरचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक दिंडी मालकांना आपल्या वैयक्तीक गॅस सिलिंडरमधून दीडीसाठी गॅस खरेदी केल्याने एकाच वेळी सहा ते सात गॅस सिलिंडर पंधरा दिवसांत संपतात.त्यात शासनाचे वर्षाला १२ च अनुदानीत गॅस सिलिंडर देण्याचे बंधन घातले आहे. यामुळे यंदा सर्वच बैठकांमध्ये वारक-यांनी व दिंड्या मालकांनी सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सोमवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देखील या विषयावर चर्चा झाली होती.
याबाबत पुरवठा उपायुक्त प्रकाश कदम यांनी मंगळवारी तातडीने सर्व गॅस कंपनीचे अधिकारी व संबंधित अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी शहर अन्न धान्य वितरण अधिकारी निलीमा धायगुडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत पिसाळ, ज्ञानेश्वर महाराज पालीख सोहळा दिंडी समाजचे अध्यक्ष मारुती कोकाटे उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रत्येक दिंडीला पाखली सोहळा कालावधीत किमान आठ ते दहा गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याचे तिन्ही गॅस कंपन्यानी मान्य केले. यासाठी पालखी मार्गावर सिलिंडर पुरवण्यासाठी खास वाहन तैनात करण्या येणार आहे. सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर मिळण्यासाठी प्रत्येक दिंडीला आपले बँक खाते उघडावे लागणार आहे.

Web Title: Finally, the gas cylinders at a discounted price to Warak