अखेर रिपाइंचा महानगराध्यक्ष कांबळे गजाआड धोपेकर हत्याकांड प्रकरण

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

अकोला: पातूर रोडवरील जयराज वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर याच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे (३८) याला जुने शहर पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली.

Finally, the CPI (M) leader of the RPI, Kamble Gajad Dopeke murder case | अखेर रिपाइंचा महानगराध्यक्ष कांबळे गजाआड धोपेकर हत्याकांड प्रकरण

अखेर रिपाइंचा महानगराध्यक्ष कांबळे गजाआड धोपेकर हत्याकांड प्रकरण

ोला: पातूर रोडवरील जयराज वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर याच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे (३८) याला जुने शहर पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली.
बिलाचे पैसे देण्याच्या वादातून सतीश खंडारे, सागर उपर्वट, नीतेश गुलाबराव खंडारे, विवेक प्रकाश इंगळे यांनी बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर यास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेपूर्वी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे याने बारमधील भूषण महादेव इंगळे (३५) याला मोबाईलवरून माझ्या माणसांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी आणि त्यांना बिल मागू नये. अन्यथा तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर कांबळे याच्या सहकार्‍यांनी बिल देण्यावरून वाद घालून वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर यास चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी पोलिसांनी गजानन कांबळे यास अटकही केली होती; परंतु त्याची जामिनावर सुटका झाली होती. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गजानन कांबळे याच्यासह त्याच्या सर्व सहकार्‍यांविरुद्ध भादंवि कलम ३0२ (३४) नुसार गुन्हा दाखल करून त्याच्या चारही सहकार्‍यांना अटक केली होती. गजानन कांबळे हा फरार झाला होता. गुरुवारी रात्री जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांना कांबळे हा घरी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून, मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. (प्रतिनिधी)
बॉक्स:
कांबळेला सोमवारपर्यंत कोठडी
सुनील धोपेकर हत्याकांडातील आरोपी गजानन कांबळे यास अटक केल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एस. जांभळे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक सरकारी विधिज्ञ राजेश औशाल यांनी, आरोपीने धोपेकर यास मारण्यासाठी त्याच्या सहकार्‍यांना चिथावणी दिली होती. तसेच आरोपींवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
बॉक्स:
व्यापार्‍याला धमकावल्याच्या गुन्ह्यातही समावेश
एका व्यापार्‍याला जबर दुखापत करण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी नगरसेवक अलियार खान ऊर्फ अल्लू पहेलवान, त्याची मुले, भाऊ व रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये कांबळे हा फरार होता. आता कोतवाली पोलीसही त्यास ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
छाया: १३ सीटीसीएल: ४८(आरोपी गजानन कांबळे)
000000000000000000000

Web Title: Finally, the CPI (M) leader of the RPI, Kamble Gajad Dopeke murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.