शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर, मुख्यमंत्री चौहानांविरुद्ध अरुण यादव मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 03:25 IST

काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री उमेदवारांची सहावी व शेवटची यादी जाहीर केली.

भोपाळ : काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री उमेदवारांची सहावी व शेवटची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे वरीष्ठ नेते अरुण यादव यांच्या नावाचा समावेश आहे. ते मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या विरुद्ध बुधनीमधून निवडणूक लढविणार आहेत. भाजपनेसुद्धा ७ उमेदवारांचा समावेश असलेली शेवटची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जताराची जागा मित्रपक्ष लोकतांत्रित जनता दलसाठी (एलजेडी) सोडलेली आहे. मुख्यमंत्री चव्हान विरुद्ध अरुण यादव शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.काँग्रेसने अनुसुचित जातीसाठी राखीव असलेली जतारा येथील जागा एलजेडीसाठी सोडलेली आहे. एलजेडी येथे विक्रम चौधरी यांना निवणूक रिंंगणात उतरविण्याची शक्यता आहे.आम्ही २३० पैकी २२९ उमेदवारांची यादी जाहीर केली असल्याचे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता पंकज चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.भोपाळवरुन ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या बुधनी हे चौहाण यांचा गृहमतदार संघ असल्याचे मानल्या जाते. ते १९९० मध्ये येथून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकले होते. या मतदार संघातून ते पाचव्यांदा निवडणूक लढवित आहेत. २०१३ मध्ये चौहाण यांनी बुधनी मतदार संघातून काँग्रेसच्या महेंद्रसिंग चौहाण यांचा ८४००० मतांनी पराभव केला होता.यादव यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या अंतिम यादीत इंदूर-१ (संजय शुक्ला), इंदूर -२(मोहन सिंग सेंगर), इंदूर -५(सत्यनारायण पटेल), मानपूर-एसटी(ग्यानवती सिंग) आणि रतलाम ग्रामिण-एसटी(थवरलाल भुरिया) यांचा समावेश आहे.भाजपच्या अंतिम यादीत उत्तर भोपाळ मतदार संघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार अरिफ अकील यांच्या विरुद्ध महिला उमेदवार फतिमा रसूल सिद्दिकी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अन्य जागांसाठी पवई (प्रल्हाद लोधी), पन्ना (ब्रिजेद्रा सिंग), लखनडोन -एसटी( विजय उईके), सिवनी-मालवा (प्रेम शंकर वर्मा) , महिदपूर (बहादूर सिंग चौहाण) आणि गॅरोथ (देविलाल धाकर) यांचा समावेश आहे. भाजपने राज्यातील २३० जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असल्याचे पक्षाचे प्रवक्ता सर्वेश तिवारी यांनी स्पष्ट केले.सरताज सिंह यांचा भाजपला रामरामपक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते सरताज सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने त्यांना होशंगाबाद मतदार संघातून मैदानात उतरविले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरताज सिंह यांचा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, सरताज सिंह पाच वेळा खासदार होते.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपा