शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आता चित्रपट सेन्सॉर घोटाळा!

By admin | Updated: July 7, 2015 23:35 IST

चित्रपट सेन्सॉर बोर्डाने कोणताही नियम वा कायदा विचारात न घेता गेल्या दोन वर्षांत ३०० हून अधिक चित्रपटांचे आधी केलेले वर्गीकरण बदलल्याची धक्कादायक माहिती अधिकारामुळे उघड झाली आहे.

मुंबई : चित्रपट सेन्सॉर बोर्डाने कोणताही नियम वा कायदा विचारात न घेता गेल्या दोन वर्षांत ३०० हून अधिक चित्रपटांचे आधी केलेले वर्गीकरण बदलल्याची धक्कादायक माहिती अधिकारामुळे उघड झाली आहे. याखेरीज चित्रपटांना जाहीर प्रदर्शनाचा परवाना सेन्सॉर बोर्डाने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे तसेच पक्षपातीपणा केल्याचेही दिसून आले आहे.मुंबईतील एक ‘आरटीआय’ कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी केलेल्या अर्जावर खुद्द भारताच्या नियंत्रक आणि महालेखापालांनीच (कॅग) ही माहिती दिली आहे. दुर्वे यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरात ‘कॅग’ने त्यांनी केलेल्या सेंन्सॉर बोर्ड फॉर फिल्म सर्टिर्फिकेशनच्या (सीबीएफसी) मुंबई कार्यालयाच्या १ आॅक्टोबर २०१३ ते ३१ मार्च २०१५ या कालासाठीच्या लेखापुस्तकांच्या तपासणीचा ७० पानी सविस्तर अहवालच त्यांना उपलब्ध करून दिला आहे. यात सेंन्सॉर बोर्डाच्या कामकाडाचे ‘डिजिटायजेशन’ करण्यासाठी बरीच मोठी रक्कम खर्च करूनही ऐतिहासिक दस्तावेजांच्या डिजिटायजेशनचे डेटा एन्ट्रीचे काम अपूर्ण असल्याबद्दलही ताशेरे ओढण्यात आले आहेत.तपासणीच्या काळात सेन्सॉर बोर्डाने कोणताही कायदा व नियम विचारात न घेता आधी ‘ए’ प्रमाणपत्र दिलेल्या १७२ चित्रपटांची वर्गवारी बदलून नंतर त्यांना ‘यूए’ असे प्रमाणपत्र दिले. तसेच आधी ‘यूए’ प्रमाणपत्रदिलेल्या १६६ चित्रपटांचे नंतर ‘यू’ वर्गात वर्गीकरण केले. यामुळे अनियमित पद्धतीने चित्रपटांचे वर्गीकरण बदलले गेले. (विशेष प्रतिनिधी)-----------मागणी न करताच फेरपरीक्षण!‘कॅग’ला या तपासणीत असेही आढळून आले की,‘गॅब्रिएल’ आणि ‘थ्री कॅन प्ले दॅट गेम’ या दोन चित्रपटांचे परीक्षण सेन्सॉर बोर्डाचे सदस्य श्रीमती जे. एस. महामुनी व एल. जी. माने यांनी फेब्रुवारी २००९ मध्ये केल्याच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंदी आहेत. खरे तर या चित्रपटाच्या फेरपरीक्षणाचा अर्ज कोणीही केला नव्हता. तरी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटांना जी प्रमाणपत्रे दिली त्यात या चित्रपटांचे अध्यक्षांचे सचिव व्ही. के. चावक यांनी ३० मार्च २००९ रोजी फेरपरीक्षण केल्याचे दाखविले गेले.

------------> ‘कॅग’च्या अहवालात असेही म्हटले आहे की, मोठी रक्कम खर्च करूनही सेन्सॉर प्रमाणपत्रांशी संबंधित सुमारे ४.१० लाख नोंदींचे व फीचर फिल्मसंबंधीच्या फायलींच्या ६० लाख पानांचे डिजिटायजेशन झालेले नाही.> सर्टिर्फिकेशन फी आणि सेस यांच्या दरांमध्ये गेल्या अनुक्रमे सहा व १२ वर्षांत कोणतीही सुधारणा केली गेली नसल्याचे नमूद करून ‘कॅग’चा अहवाल म्हणतो की, सन २०११ ते २०१३ या काळात सेन्सॉर बोर्डास सर्टिफिकेशन फीपोटी सुमारे १४ कोटी रुपये तर सेसपोटी ५.५ कोटी रुपये मिळाले.> ‘आरटीआय’ अर्जदार दुर्वे यांनी यास ‘सेन्सॉर गेट’ असे संबोधून सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर तीव्र टीका केली.----------------‘कॅग’चा हा तपासणी अहवाल अद्याप माझ्याकडे आलेला नाही. पण त्यात उल्लेख असलेल्या सर्व गोष्टी मी अध्यक्ष नसतानाच्या काळात झालेल्या आहेत. पण भविष्यात अशा अनियमितता होणार नाहीत, याची मी खात्री देतो.-पहलाज निहलानी, चित्रपट सेन्सॉर बोर्ड