विनापरवानगी वैद्यकीय महाविद्यालय चालविणार्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 22, 2014 00:10 IST2014-12-22T00:10:58+5:302014-12-22T00:10:58+5:30
नाशिक : शासनाची वा आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी नसताना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोडच्या डॉ़ पुरी दाम्पत्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भालेराव मळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शेजवळ यांनी डॉ़ पुरी दाम्पत्याविरोधात फिर्याद दिली आहे़

विनापरवानगी वैद्यकीय महाविद्यालय चालविणार्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल
न शिक : शासनाची वा आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी नसताना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोडच्या डॉ़ पुरी दाम्पत्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भालेराव मळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शेजवळ यांनी डॉ़ पुरी दाम्पत्याविरोधात फिर्याद दिली आहे़ शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. मोहन पुरी आणि डॉ. विजया पुरी यांनी नाशिकरोड परिसरातील त्र्यंबक कॉम्प्लेक्समध्ये इंडियन युनिर्व्हसिटी ऑफ अण्टरनेटीव्ह मेडिसीन्स ॲण्ड रिसर्च सेंटर या नावाने विद्यापीठ सुरू करून भारतीय पारंपरिक चिकित्सा योग नॅचरोपॅथी नावाचे महाविद्यालय सुरू केले़ सुमारे १० वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू असून, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विविध पदव्याही देण्यात आल्या आहेत. अशोक दामोदर कुंभारे (रा. औरंगाबाद), बाळू गणपत गवळी, खंडू पांडू भोये, कांचन दारासिंग वळवी, गोरख कदम, अनंता टोपले (सर्व रा. त्र्यंबकेश्वर) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांपूर्वी लाखो रुपये घेऊन पदवी दिल्या़ तसेच आणखी २५ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कोर्स घेण्याची परवानगी घेतली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे़डॉ. पुरी यांच्या या महाविद्यालयास कोणतीही मान्यता नसल्याने ते विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक करीत असल्याचा आरोप शेजवळ यांनी केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात डॉ. मोहन पुरी व विजया पुरी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)