शाहजहानपूर : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्स्प्रेस-वेवरूनही लढाऊ विमाने झेपावू शकणार आहेत. त्यासाठीचे प्रात्याक्षिक शुक्रवारी यशस्वी पार पडले असून, त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.
उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यातील गंगा एक्स्प्रेसवेवर भारतीय हवाई दलाने शुक्रवारी 'लँड अँड गो' सरावास सुरुवात केली.
३.५ किमी लांबीच्या रस्त्यावर ही ड्रिल झाली, ज्यामुळे भारताच्या संरक्षण सज्जतेत एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा
ही भारतातील पहिली अशी एअरस्ट्रिप जेथे रात्री आणि दिवसाही लढाऊ विमानांचे लँडिंग होऊ शकते. याआधी लखनऊ-आग्रा व पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अशा प्रकारचे आपत्कालीन सराव करण्यात आले होते, पण ते फक्त दिवसा मर्यादित होते.
कोणत्या विमानांच्या झाल्या चाचण्या?
राफेल, एसयू -३० एमकेआय, मिराज-२०००, मिग-२९, जग्वार, सी-१३०जे सुपर हर्क्युलस, एएन-३२ व एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टर या लढाऊ विमानांचा समावेश आहे. कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून, दिवसाच्या वेळी अर्धा डझनपेक्षा अधिक लढाऊ विमानांचे उड्डाण व लँडिंग झाले. रात्रीच्या सरावासाठी संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंत जालालाबाद ते मदनपूर दरम्यानचा बरेली-इटावा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
लढाऊ विमानांसाठी चौथा एक्स्प्रेस-वे
गंगा एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्यावर, तो आपत्कालीन धावपट्टी असलेला उत्तर प्रदेशातील चौथा एक्स्प्रेसवे असेल. पण रात्रीचे उड्डाण शक्य होईल असा पहिलाच असेल. त्यामुळे सतत २४x७ ऑपरेशनल तयारी शक्य होईल. एक्स्प्रेसवे मेरठ ते प्रयागराज दरम्यान बांधण्यात येत असून ५९४ किमी लांबीचा आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मंजुरी दिली. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ३६,२३० कोटी रुपये इतका आहे.