Video - दे दणादण! पाणीपुरीवरुन तुफान राडा; दुकानदार-ग्राहक भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:58 IST2023-08-31T14:45:24+5:302023-08-31T14:58:54+5:30
दुकानदार आणि ग्राहक यांच्यात रस्त्याच्या मधोमध फिल्मी स्टाईलमध्ये हाणामारी झाली आहे.

Video - दे दणादण! पाणीपुरीवरुन तुफान राडा; दुकानदार-ग्राहक भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले
पाणीपुरीवरून भररस्त्यात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुकानदार आणि ग्राहक यांच्यात रस्त्याच्या मधोमध फिल्मी स्टाईलमध्ये हाणामारी झाली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाणीपुरीवरून झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की दोन जण रस्त्यावर एकमेकांना खूप मारहाण करत आहेत. रस्त्याने लोकांची ये-जा सुरू असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामसेवक नावाचा तरुण हमीरपूरमधील अकिल तिराहे येथे पाणीपुरी विकतो. तो दहा रुपयांना पाच पाणीपुरी विकतो. मात्र गावातील एका तरुणाने त्याला सात पाणीपुरी खायला दे असं सांगून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
Kalesh b/w a Golgappa seller and Customer over 10rs me 7 golgappa hi kyu? pic.twitter.com/kpa0kIeiQ8
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 30, 2023
पाणीपुरीवरून त्यानंतर जे काही घडले ते तुम्ही व्हायरल क्लिपमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. gharkekalesh या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "10 रुपयांमध्ये फक्त 7 का भाऊ?" असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक वेळा व्हि़डीओ पाहिला गेला आहे, तर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.