शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आठवीतील 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 10:22 IST

देशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56%  विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

ठळक मुद्देदेशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याचीमाहिती आता समोर आली आहे. 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इयत्ता तिसरीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नसल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने नवनवीन योजना आखल्या जात असतात. मात्र देशभरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 56% विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच 27% मुलांना साधं वाचताही येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेच्या सर्व्हेक्षणात ही माहिती उघड झाली आहे. 'प्रथम' च्या रिपोर्टनुसार, इयत्ता आठवीत शिकणारे 56 टक्के विद्यार्थी तीन अंकी संख्येला एका अंकी संख्येने भागू शकले नाहीत. तर, इयत्ता पाचवीच्या 72 टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच जमत नाही. इयत्ता तिसरीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नसल्याचं समोर आलं आहे.

 दहा वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती याची तुलना केली असता आत्ताची स्थिती अधिक वाईट असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. 2008 मध्ये इयत्ता पाचवीच्या 37 टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत होतं. आता मात्र ही संख्या 28 टक्क्यांहून कमी झाली आहे. तर 2016 मध्ये ही संख्या 26 टक्क्यांपर्यंत घसरली होती. तसेच अनेक विद्यार्थी व्यवस्थित वाचूही शकत नसल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील प्रत्येक 4 विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी वाचन जमत नसल्याच्या कारणावरून इयत्ता आठवीनंतर शिक्षण सोडून देतो, अशी माहितीही पुढे आली आहे. 

गणितामध्ये मुली या मुलांच्या खूपच मागे आहेत. फक्त 44 टक्के मुलींना भागाकार करता येतो, तर भागाकार करता येणाऱ्या मुलांची संख्या 50 टक्के इतकी आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हा आकडा उलटा आहे. या राज्यांमध्ये भागाकार करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेने ही आकडेवारी 28 राज्यांमधील विविध 596 जिल्ह्यांमधून गोळा केली आहे.यामध्ये 3 ते 16 वयोगटातील मुलांचा समावेश होता. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी