शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मथुरेच्या फटाकेबाजारात लागली भीषण आग, ७ दुकाने भस्मसात, फायरमॅनसह ९ जण होरपळले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 20:01 IST

Mathura Fire News: उत्तर प्रदेशमधील मथुरा शरहातील गोपालबागमध्ये फटाके बाजारातील काही दुकानांमध्ये रविवारी आग लागल्याने ७ दुकानं जळून भस्मसात झाली. या आगीमध्ये एका फायरमनसह ९ जण होरपळले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

उत्तर प्रदेशमधील मथुरा शरहातील गोपालबागमध्ये फटाके बाजारातील काही दुकानांमध्ये रविवारी आग लागल्याने ७ दुकानं जळून भस्मसात झाली. या आगीमध्ये एका फायरमनसह ९ जण होरपळले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

पोलिसांनी सांगितले की, या ७ दुकानांकडे फटाके विकण्याची परवानगी होती. या दरम्यान, महावनचे क्षेत्राधिकारी आलोक सिंह यांनी सांगितले की, ही दुर्घटना राया येथील गोपालबाग येथे असलेल्या एका तात्पुरत्या फटाक्यांच्या बाजारामध्ये घडली. आगीची ही घटना घडली तेव्हा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तसेच लोक फटाके खरेदी करण्यामध्ये गुंतले होते. 

सिंह यांनी पुढे सांगितले की, आज एका दुकानामध्ये आग लागली. त्यानंतर ही आग बघता बघता इतर दुकानांमध्ये पसरली. ही घटना घडली तेव्हा इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तसेच लोक फटाके खरेदी करण्यामध्ये गुंतले होते. घटनेनंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

त्यांनी पुढे सांगितले की, फटाक्यांच्या सात दुकानांचं सर्वाधिक नुकसान झालं.  आपापल्या दुकानातील साहित्य वाचवण्याच्या प्रयत्नात दुकानदार आगीत होरपळून जखमी झाले. घटनास्थळावर उपस्थित असलेले फायरमन चंद्रशेखर यांनी उपलब्ध उपकरणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. त्यांनी प्रयत्नपूर्वक आग सुमारे सहा दुकानांपर्यंत पोहोचू दिली नाही. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या चार जणांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये आणि इतरांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. 

टॅग्स :fireआगfire crackerफटाके