‘बीआरएस’ सोडणारे मुख्यमंत्र्यांविरुद्ध मैदानात, तीन खासदारांनाही उतरविले रणांगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 09:50 IST2023-10-23T09:49:59+5:302023-10-23T09:50:56+5:30
बीआरएसचे विद्यमान आमदार एटाला राजेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गजवेल मतदारसंघात टक्कर देणार आहेत.

‘बीआरएस’ सोडणारे मुख्यमंत्र्यांविरुद्ध मैदानात, तीन खासदारांनाही उतरविले रणांगणात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ५२ उमेदवारांच्या पहिल्या यादीत रविवारी बंदी संजय कुमार यांच्यासह तीन लोकसभा खासदारांचा समावेश करण्यात आला. बीआरएसचे विद्यमान आमदार एटाला राजेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गजवेल मतदारसंघात टक्कर देणार आहेत.
वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल गेल्यावर्षी निलंबन मागे घेतल्यानंतर भाजपने त्यांचे फायरब्रॅण्ड हिंदुत्व नेते टी. राजा सिंग यांना त्यांच्या गोशामहल जागेवरून तिकीट दिले आहे. राजेंद्र यांना हुजुराबाद येथूनही उमेदवारी देण्यात आली आहे. बंदी संजय कुमार यांना करीमनगरमधून आणि अन्य दोन खासदार, सोयम बापूराव आणि धर्मपुरी अरविंद यांना बोथ आणि कोरटला येथून उमेदवारी देण्यात आली आहे. के. वेंकट रमणा रेड्डी हे कामारेड्डी मतदारसंघात मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी लढत देतील. केसीआर दाेन ठिकाणांवरुन रिंगणात आहेत.