साईदरबारी रंगांची उधळण
By Admin | Updated: March 29, 2016 00:24 IST2016-03-29T00:24:37+5:302016-03-29T00:24:37+5:30
शिर्डी : साईंची शिर्डी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांनी न्हावून निघाली़ साई समाधीवर रंगांची उधळण करत सर्व भेदभाव विसरुन एकत्र आलेल्या साईभक्तांनी रथ मिरवणुकीत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला़ दुष्काळ व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीचा शहरात मात्र बेरंग झाला़

साईदरबारी रंगांची उधळण
श र्डी : साईंची शिर्डी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांनी न्हावून निघाली़ साई समाधीवर रंगांची उधळण करत सर्व भेदभाव विसरुन एकत्र आलेल्या साईभक्तांनी रथ मिरवणुकीत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला़ दुष्काळ व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीचा शहरात मात्र बेरंग झाला़साईबाबांना रंगांची आवड होती. आपल्या हयातीत तेही रंगपंचमीत सहभागी होत़ यामुळे साई संस्थानात रंगपंचमीची अनेक वर्षांची परंपरा आहे़ या दिवशी साई समाधीवर चढवण्यात येणार्या वस्त्रांवरही रंग टाकण्यात येतो़ साई दरबारी रंगोत्सवात सहभागी होण्यासाठी अनेक भाविक आवर्जुन हजेरी लावत असतात़ या निमित्ताने शहरातून सायंकाळी रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते़ आजही पारंपरिक पद्धतीने रथातून साईप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली़ यात देशाच्या विविध भागातून आलेले अनेक धर्माचे, जातीचे भाविक गरीब-श्रीमंतीची दरी ओलांडून श्रद्धेच्या रंगात न्हाऊन निघाले़ विविध रंगांची उधळण व साईनामाच्या गजराने सर्व परिसर भक्तीमय झाला़ यावेळी ढोलताशांच्या तालावर स्थानिक तरुणांबरोबरच भाविकही बेधुंद होत थिरकत होते़ संपूर्ण पालखी रस्ता भाविकांच्या गर्दीने तुडूंब भरला होता़शिर्डीत पालखी मार्गावर असलेल्या प्राचीन कानिफनाथ मंदिरातही कानिफनाथ समाधी दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला़ (तालुका प्रतिनिधी)2803-2016-साई-01रंगपंचमी 1 व 2,जेपीजे