भविष्यात खताचे दर कमी होतील! कोळशापासून खत निर्मितीचा प्रयत्न; हंसराज अहिर यांची माहिती
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:00+5:302015-03-08T00:31:00+5:30
अकोला- देशात गरजेपेक्षा जास्त खत आहे. खत निर्मितीसाठी होणारा खर्च बघता जास्त सबसिडी देणे शक्य नसले, तरी केंद्र शासन ७0 टक्के सबसिडी देत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कोळशापासून गॅस व त्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प ओडिशात उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात खताच्या किमती कमी होऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शनिवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिली.

भविष्यात खताचे दर कमी होतील! कोळशापासून खत निर्मितीचा प्रयत्न; हंसराज अहिर यांची माहिती
अ ोला- देशात गरजेपेक्षा जास्त खत आहे. खत निर्मितीसाठी होणारा खर्च बघता जास्त सबसिडी देणे शक्य नसले, तरी केंद्र शासन ७0 टक्के सबसिडी देत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कोळशापासून गॅस व त्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प ओडिशात उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात खताच्या किमती कमी होऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शनिवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिली. सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री अहिर शनिवारी अकोला येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत, अहिर यांनी देशातील खताच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. गतवर्षी मागणीपेक्षा जास्त खताचा पुरवठा करण्यात आला होता. यावर्षीही खताचा पुरवठा आवश्यकतेनुसार केला जाईल. केंद्र शासन खतावर ७0 टक्के सबसिडी देत आहे. यापेक्षा जास्त सबसिडी देणे शक्य नाही. खताच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ओडिशामध्ये कोळशापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातून खत निर्मितीवर भर दिला जाणार असून, त्यामुळे खताच्या किमतीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, अशी माहिती अहिर यांनी दिली. खताच्या वितरणाबाबत राज्य सरकारवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही ना. अहिर यांनी दिली. देशात जेनेरिक औषध वितरण व्यवस्थेत सुधार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभर ३ हजार जेनेरिक औषध केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारताला वनौषधींचे भांडार म्हणतात. वनौषधींच्या निर्मितीवर भर दिला जाईल, असे अहिर यांनी सांगितले. देशात नवीन भूमी अधिग्रहण कायदा लागू केला जाणार आहे. त्यासाठी १२६ वर्षे जुन्या कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे. या कायद्याबाबत काही गैरसमज आहेत. त्याबाबत मित्र पक्षच नव्हे तर विरोध करणार्या काँग्रेसोबत चर्चा करून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अहिर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)