मुझफ्फनगरमधील उद्या तीन केंद्रांवर फेरमतदान
By Admin | Updated: May 11, 2014 18:30 IST2014-05-11T18:29:56+5:302014-05-11T18:30:15+5:30
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तीन मतदान केंद्रावर उद्या फेरमतदान घेण्यात यावे असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.

मुझफ्फनगरमधील उद्या तीन केंद्रांवर फेरमतदान
>ऑनलाइन टीम
मुझफ्फरनगर, दि. ११ - उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तीन मतदान केंद्रावर उद्या फेरमतदान घेण्यात यावे असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणुकीदरम्यान बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराकडून गैरप्रकार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतल्याचे जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश इंदरमणी त्रिपाठी यांनी सांगितले. उद्या (सोमवार) जिल्ह्यातील तीन केंद्रावर फेरमतदान घेण्यात येईल असे ते म्हणाले.
दंगलग्रस्त मुझफ्फरनगरमध्ये १० एप्रिल रोजी ममतदान झाले होते. त्यावेळी तेथील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार कादीर राणा यांनी गैरप्रकार केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर उद्या तीन केद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार आहे.