शाकंभरी प्रतिष्ठानकडून कष्टकर्यांचा सत्कार
By Admin | Updated: May 6, 2014 17:09 IST2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T17:09:04+5:30
मूर्तिजापूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील कष्टकरी लोकांचा २ मे रोजी शाकंभरी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला.

शाकंभरी प्रतिष्ठानकडून कष्टकर्यांचा सत्कार
म र्तिजापूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील कष्टकरी लोकांचा २ मे रोजी शाकंभरी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. शहरातील जे.बी. विद्यालयात २ मे रोजी कामगार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात टांगेवाले, हातगाडीधारक, कटलावाले आदी कष्टकरी व्यक्तींना आमंत्रित क रू न शाकंभरी प्रतिष्ठानतर्फे त्यांना दुपे देण्यात आले. या कार्यक्रमाला ३३ कष्टकरी व्यक्तींची उपस्थिती होती. नगराध्यक्षा नसरीन तब्बसूम निजामोद्दिन, छोटू तिडके, प्रकाश बोनगिरे, संजय कळमकर, शिवकु मार दुबे, ॲड. राकेश जैन, राजेश अग्रवाल, सतीष अग्रवाल, प्रा. ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याध्यापक अर्जुन मोरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्र माचे संचालन व आभार प्रदर्शन चंदन अग्रवाल यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)