शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला देणार पॅलेस्टाइनला भेट, मोदी पॅलेस्टाइनला जाणारे ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 08:39 IST

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. सत्तेत आल्यापासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी अनेक कारणांनिमित्त वेगवेगळे परदेश दौरे केले आहेत. मोदी हे भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक परदेशांचे दौरे करणारे पंतप्रधान असल्याचंही म्हटले जात आहे.

सध्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचा नियोजित दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइन देशाला भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाइनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त झाले आहे.  10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनला रवाना होणार आहेत. 

जॉर्डनमधील अम्मनवरुन पंतप्रधान पॅलेस्टाइनच्या रामल्ला येथे जातील. तेथे त्यांचे नियोजित कार्यक्रम होणार आहेत.  दरम्यान, पहिल्या तीन वर्षात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 27 देशांना भेट दिली तर मोदींनी पहिल्या 3 वर्षात तब्बल 49 देशांना भेट दिली आहे. वर्ष 2017 मध्ये  नरेंद्र मोदी यांनी 14 देशांना भेट दिली तर 2018 वर्षातील परदेश दौ-याची सुरुवात ते पॅलेस्टाइनपासून करणार आहेत.

दरम्यान, 4 जुलै 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. या तीन वर्षांच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पॅलेस्टाइनला भेट दिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्याच्यावेळी पॅलेस्टाइनला भेट दिली नव्हती. त्यामुळे त्याबाबत जगभरात आणि विशेषतः भारतीय राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्या.

संयुक्त अरब अमिराती दौरा आणि पॅलेस्टाइन भेट एकत्र करण्याचे नियोजन साऊथ ब्लॉकतर्फे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटसाठी उपस्थित राहाणार आहेत. या परिषदेचे यजमान संयुक्त अरब अमिराती असून 11 ते 13 फेब्रुवारी 2018 या तीन दिवसांमध्ये ती भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीची ही दुसरी भेट असेल. संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांचे संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत आहेत. अबूधाबीचे राजपुत्र शेख झायेद बिन अल नाह्यान यांनीही भारताला दोन वेळा भेट दिली आहे. त्यामध्ये 26 जानेवारी 2016 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भारतदौऱ्याचाही समावेश आहे.

जेरुसलेमचा मुद्दा आणि पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूतअमेरिकेने आणि विशेषतः डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या वर्षी डिसेंबर महिन्यात नव्या वादाला जन्म दिला आहे. जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देऊन मध्यपुर्वेत नव्या अशांततेचे वादळ उठले. मात्र भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या बाजूने मतदान केले नाही. या मुद्यावर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतील. तर रावळपिंडीत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पॅलेस्टाइनचे राजदूत वालिद अबू अली कुख्यात दहशतवादी हाफिज सईद यांच्याबरोबर एकाच कार्यक्रमात सहभागी झाले होते. याबाबत भारत पॅलेस्टाइन सरकारकडे रितसर नाराजी व्यक्त करणार असून, पॅलेस्टाइनच्या भारतातील राजदुताकडेही याचा जाब विचारला जाणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा