Features 35 meters higher than the Eiffel Tower, The world's tallest railway bridge was built in Kashmir | आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज काश्मीरमध्ये बांधून तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये

आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज काश्मीरमध्ये बांधून तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर हा ब्रिज उभारण्यात आला आहेचिनाब नदीच्या तळापासून या ब्रिजची उंची ही ३५९ मीटर आहेया ब्रिजचं खास वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे ब्रिजवर रिश्टर स्केलवरील ८ तीव्रतेच्या भूकंपाचा तसेच अतीतीव्रतेच्या स्फोटाचा काहीही परिणाम होणार नाही

नवी दिल्ली - आयफेल टॉवरपेक्षाा ३५ मीटर उंच आणि जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज जम्मू काश्मीरमध्ये बांधून तयार झाला आहे. या ब्रिजचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. आता हा ब्रिज जवळपास बांधून तयार झाला आहे. आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या ब्रिजचे फोटे शेअर करून ही खूशखबर दिली आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर हा ब्रिज उभारण्यात आला आहे. या ब्रिजच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा ब्रिज हा बांधकामाचा उत्तम नमुना आहे. भारतीय रेल्वे स्थापत्यक्षेत्रातील अजून एक मैलाचा दगड पार करण्याच्या मार्गावर आहे. हा ब्रिज जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज असेल, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.  इंद्रधनुष्याच्या आकाराच्या या ब्रिजचे बांधकाम २०१७ मध्ये सुरू झाले होते. हा ब्रिज भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे ज्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला भारताच्या अन्य भागाशी जोडण्यात येणार आहे. चिनाब नदीवर १२५० कोटी रुपये खर्चून हा ब्रिज बांधण्यात आला आहे. चिनाब नदीच्या तळापासून या ब्रिजची उंची ही ३५९ मीटर आहे. हा ब्रिज पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने उंच आहे. 

या ब्रिजचं खास वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे ब्रिजवर रिश्टर स्केलवरील ८ तीव्रतेच्या भूकंपाचा तसेच अतीतीव्रतेच्या स्फोटाचा काहीही परिणाम होणार नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य दहशतवादी हल्ले आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी ब्रिजमध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. ब्रिजची एकूण लांबी ही १३१५ मीटर असेल.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Features 35 meters higher than the Eiffel Tower, The world's tallest railway bridge was built in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.