दिल्लीत पुन्हा निर्भया! धावत्या गाडीमध्ये महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: May 15, 2017 08:36 IST2017-05-15T07:47:58+5:302017-05-15T08:36:36+5:30

ल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Fearless again in Delhi! Rape woman in moving train | दिल्लीत पुन्हा निर्भया! धावत्या गाडीमध्ये महिलेवर बलात्कार

दिल्लीत पुन्हा निर्भया! धावत्या गाडीमध्ये महिलेवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 - दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका 26 वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी मिळून धावत्या गाडीमध्ये बलात्कार केला आणि नंतर तिला दिल्लीच्या रस्त्यावर फेकून पसार झाले. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. 
 
पीडित महिलेचे गुरगाव येथील तिच्या घराजवळून अपहरण करुन आरोपींनी तिच्यावर गाडीत अमानुष अत्याचार केले. पीडित महिला शुक्रवारी संध्याकाळी तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी दिल्लीत कनॉट प्लेस येथे गेली होती. तिचा मित्र शहादरा येथे राहतो. मित्राला भेटल्यानंतर दोघे एकत्र सिनेमाला गेले. रात्री 10.30च्या सुमारास सिनेमाहॉलमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनर केला. 
 
त्यानंतर रात्री उशिरा गुरगाव येथील घरी परतण्यासाठी तिने ओला कॅब बुक केली. तिचा मित्रही तिच्यासोबत होता. मध्यरात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान गाडीतून उतरुन पीडित महिला घराच्या दिशेने चालली असताना तीन आरोपी तिथे आले. त्यांनी जबरदस्तीने तिला स्विफ्ट डिझायर गाडीत कोंबले व दिल्लीच्या रस्त्यावर गाडी पळवताना तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 
 
पीडित महिलेने जी माहिती दिलीय त्यानुसार नजफगड आणि आसपासच्या निर्जन भागात तिच्यावर  बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जवळपास पाच तास तिच्यावर अत्याचार सुरु होता. पीडित महिलेच्या जबानीनुसार आरोपींना तिची हत्या करायची होती. पण तिने जिवंत सोडण्यासाठी विनवण्या केल्या. अखेर सकाळी 6.30 च्या सुमारास आरोपींनी तिला दिल्लीच्या रस्त्यावर फेकले आणि पसार झाले. तिथून जाणा-या एका दुचाकीस्वाराच्या मदतीने तीने नजफगड टोलनाक्यावर पोहोचून दिल्ली पोलिसांशी संर्पक साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली. 
 

Web Title: Fearless again in Delhi! Rape woman in moving train