RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आयबीकडून अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:04 AM2021-11-24T10:04:19+5:302021-11-24T10:06:21+5:30

Fear Of Terrorist Attack In Punjab : उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सर्व अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

fear of terrorist attack in punjab, alert issued by IB | RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आयबीकडून अलर्ट जारी

RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आयबीकडून अलर्ट जारी

googlenewsNext

जालंधर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय पंजाबमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहे. विशेषतः आरएसएस शाखा आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. याबाबतचा इशारा आयबीने पंजाब सरकारला दिला आहे. यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सर्व अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास एक तृतीयांश अधिकाऱ्यांना रात्रीच्यावेळी गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.

अलीकडे 21 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दुचाकीस्वारांनी पठाणकोटमधील आर्मी कॅम्पजवळ ग्रेनेडने हल्ला केला होता. दरम्यान, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. तसेच, या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 15 ऑगस्टपासून आतापर्यंत 25 हून अधिक ड्रोन भारतीय हद्दीत घुसले आहेत. शस्त्रे, हेरॉईन आणि टिफिन बॉम्ब पाठवले जात आहेत. 11 टिफिन बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

आयएसआय पंजाबमध्ये सातत्याने शस्त्रे आणि दारूगोळा पाठवत आहे. अलीकडील अजनाळा घटनेचे कनेक्शनही दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. अजनाळ्याच्या शर्मा फिलिंग स्टेशनवर झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर, पोलिसांनी जवळच्या गावातील चार तरुणांना पकडले होते, रुबल आणि विकी हे दोघेही पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय शीख युवा महासंघाचे प्रमुख भाई लखबीर सिंग रोडे कासिम औरव यांच्या संपर्कात होते.

तीन दिवसांपूर्वी जीरा विधानसभा मतदारसंघातील सेखवां गावातील शेतात टिफिनमध्ये हातबॉम्ब सापडला होता. आयबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये सीमेपलीकडून टिफिन बॉम्ब आणि ग्रेनेड पाठवण्यात आले आहेत, ज्यातून मोठा दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो. आयबीला पंजाबमधील हिंदू नेत्यांवर आणि आरएसएसच्या शाखांवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: fear of terrorist attack in punjab, alert issued by IB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.