शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपकडून फेसबुकला डाटा दिला जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 06:37 IST

पेमेंट डाटाच्या सुरक्षेबाबत सरकारला चिंता : ‘एनपीसीआय’ला लक्ष घालण्यास सांगितले

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रस्तावित पेमेंट सेवेचा डाटा समूहातील अन्य कंपन्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हस्तांतरित केला जाऊ शकतो, अशी भीती भारत सरकारकडून व्यक्त करण्यात आली असून, या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाला (एनपीसीआय) देण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच गुगल पेसारख्या अन्य खाजगी पेमेंट कंपन्यांचा डाटाही अन्यत्र सामायिक होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना एनपीसीआयला सरकारकडून देण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. व्हॉट्सअ‍ॅपची प्रस्तावित पेमेंट सेवा ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’वर (यूपीआय) आधारित आहे. यूपीआयद्वारे बँक खात्यावरून वास्तवकालीन निधी हस्तांतरण होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपने डाटा सुरक्षेची हमी दिलेली आहे. फेसबुक आणि बिगर-व्हॉट्सअ‍ॅप उपकंपन्या व्हॉट्सअ‍ॅपचा यूपीआय व्यवहार डाटा कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी वापरीत नाहीत, असे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले आहे.

एका वरिष्ठ अधिकाºयाने याबाबत सांगितले की, फेसबुक ही व्हॉट्सअ‍ॅपची पालक कंपनी आहे. व्हॉट्सअ‍ॅपला क्लाऊड सेवाही फेसबुक या मूळ कंपनीकडून दिली जाते. त्यामुळे डाटा हस्तांतराची भीती आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा सुरू होणार आहे. डाटा सुरक्षेसाठी भारत सरकार ‘वैयक्तिक डाटा संरक्षण विधेयक’ आणत आहे. हे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे.

अधिकारी घेणार मंत्र्यांची भेटव्हॉट्सअ‍ॅपचे नवे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट हे सध्या भारत भेटीवर असून, याच आठवड्यात ते पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान डाटा सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले. डाटाची साठवणूक भारतातच करण्याचे धोरण भारत सरकारने यापूर्वीच आखले असून, व्हॉट्सअ‍ॅपने त्याचे पालन करण्याचे आधीच मान्य केले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपFacebookफेसबुक