फजलुल्लाह दहशतवादी
By Admin | Updated: January 14, 2015 00:56 IST2015-01-14T00:06:44+5:302015-01-14T00:56:57+5:30
मौलाना फजलुल्लाह

फजलुल्लाह दहशतवादी
मौलाना फजलुल्लाह
जागतिक दहशतवादी
वॉशिंग्टन : पाकिस्तान तालिबानचा प्रमुख मौलाना फजलुल्लाह हा जागतिक दहशतवादी असल्याचे अमेरिकेने मंगळवारी जाहीर केले. पेशावरमध्ये लष्कराच्या वतीने चालविल्या जाणार्या शाळेवर १६ डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. तो हल्ला आम्ही केला असा दावा तहरिक-ए-तालिबानने केला होता. या हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १५० जण ठार झाले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानने सगळ्या दहशतवाद्यांवर कारवाई करावी, असे सोमवारी पाकिस्तानला सांगितल्यानंतर काही तासांत फजलुल्लाहला जागतिक अतिरेकी जाहीर करण्यात आले.