फैयाजचे मारेकरी हिजबूल, तैयबाचे

By Admin | Updated: May 12, 2017 03:47 IST2017-05-12T03:47:38+5:302017-05-12T03:47:38+5:30

दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याची सहा अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली

Fayaz's killer Hizbul, Taiba | फैयाजचे मारेकरी हिजबूल, तैयबाचे

फैयाजचे मारेकरी हिजबूल, तैयबाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीनगर/नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याची सहा अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली व ते पाकिस्तानसमर्थित हिजबूल-मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तैयबाचे होते, असे लष्कराचे म्हणणे आहे. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, या अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असून लवकरच त्यांना पकडण्यात यश येईल, याची खात्री आहे.
काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एस. जे. एम. गिलानी म्हणाले की, फैयाज यांची हत्या झाली तेथे इन्सास रायफलच्या गोळ््यांंच्या पुंगळ््या मिळाल्या होत्या. गेल्या काही दिवसांत कुलगाम व सोपियान येथे अतिरेक्यांनी सुरक्षा दलांकडून अश रायफली पळविल्या होत्या. कुलगाममध्ये लष्करच्या तर सोपियानमध्ये तैयबाच्या अतिरेक्यांनी ही लूट केली होती. त्यामुळे लुटलेल्या त्या रायफलचाच फैयाज यांच्या हत्येसाठी वापर केला गेला व यात लष्कर व तैयबाचे अतिरेकी होते, असा सुगावा मिळतो. (वृत्तसंस्था)

Web Title: Fayaz's killer Hizbul, Taiba