शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'वडिलांनाही मुलाचा सांभाळ करण्यासाठी पितृत्व सुट्टी मिळायला हवी', सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला काय सांगितले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:37 IST

Supreme Court on Paternity Leave: मातृत्व रजेबद्दलच्या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत केंद्र सरकारला कायदा करण्याबद्दल विचार करण्याची सूचना दिली. 

'मुलांच्या संगोपनात आईची भूमिका महत्त्वाची असते, पण वडिलांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही', असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पितृत्व रजेबद्दल कायदा करण्याची सूचना केली. 

१७ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयानेसामाजिक सुरक्षा लाभाचा मुद्दा अधोरेखित करत पितृत्व रजेबद्दल निर्देश दिले. दत्तक विधान हा 'प्रजनन स्वायत्ततेच्या अधिकाराचा' एक भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. 

दत्तक मुल, मातृत्व रजेबद्दल कोर्ट काय म्हणाले? 

केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे बाळ दत्तक घेतल्यासच प्रसूती रजा मिळेल, ही अट न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. आता दत्तक घेतलेल्या मुलाचे वय कितीही असो, दत्तक घेणाऱ्या आईला १२ आठवड्यांची प्रसूती रजा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अॅडव्होकेट हंसा आनंदिनी नंदुरी यांनी या भेदभाव करणाऱ्या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन महिन्यांपेक्षा मोठे मूल दत्तक घेणाऱ्या मातांना या रजेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.

न्यायालयाने नियम घटनाबाह्य ठरवला

सामाजिक सुरक्षा संहिता २०२० मधील कलम ६० (४) नुसार, एखाद्या महिलेने तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेतले तरच तिला १२ आठवड्यांच्या प्रसूती रजेचा लाभ घेता येत होता. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा नियम घटनाबाह्य ठरवला. "मुलाच्या वयावर आधारित ही अट घालणे हे राज्यघटनेतील कलम १४ (समानतेचा अधिकार) आणि कलम २१ (जगण्याचा अधिकार) यांचे उल्लंघन आहे," असे खंडपीठाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला म्हणाले की, 'मुलाचा भावनिक, शारीरिक आणि मानसिक विकास होत असताना आईची भूमिका निश्चितपणे महत्त्वाचीच आहे. पण, पित्याची भूमिका तितकीच महत्त्वाची असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आणि न्यायाला धरून नाही.'

पालक होणं ही कोणत्याही एका व्यक्तीने पार पाडायची जबाबदारी नाही. ही दोघांचीही जबाबदारी आहे. यात आई आणि वडील दोघेही समान योगदान मुलाच्या संगोपनात महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पित्याला मुलाच्या संगोपनाची संधी दिली पाहिजे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Paternity leave for fathers too: Supreme Court directs central government.

Web Summary : Supreme Court urges paternity leave law, recognizing fathers' crucial role in childcare. Court struck down discriminatory adoption leave rules, ensuring equal benefits for adoptive mothers, regardless of the child's age. Both parents share responsibility.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSocialसामाजिकCourtन्यायालय