बापरे ! दाढी करण्यास नकार देणा-या पतीवर पत्नीनं फेकलं उकळतं पाणी
By Admin | Updated: June 3, 2017 12:37 IST2017-06-03T11:13:57+5:302017-06-03T12:37:17+5:30
पत्नीने रागाच्या भरात चक्क उकळलेलं पाणी पतीच्या चेहऱ्यावर फेकल्याची घटना घडली आहे.

बापरे ! दाढी करण्यास नकार देणा-या पतीवर पत्नीनं फेकलं उकळतं पाणी
ऑनलाइन लोकमत
अलीगड, दि. 3- पतीने दाढी करायला नकार दिल्याने पत्नीने रागाच्या भरात चक्क उकळलेलं पाणी पतीच्या चेहऱ्यावर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांना त्या महिलेवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अलीगडमध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबामध्ये ही घटना घडली आहे.
बत्तीस वर्षीय सलमान खान आणि पंचवीस वर्षीय नगमा खान या दोघांचं सहा महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. या दोघांचीही
विचारसरणी वेगळी असल्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडायला सुरूवात झाली होती. सलमान याला धार्मिक पद्धतीने जीवन जगायचं आहे तर त्याची पत्नी नगमा हिला मॉडर्न जीवनशैली हवी आहे. मॉडर्न जीवनशैली जगण्यासाठी तीने आपल्या पतीला दाढी करायला सांगितली होती.
तसंच त्यानं कुर्ता-पायजमाच्या ऐवजी पँट-शर्ट वापरावं असाही तीचा अट्टहास होता. शुक्रवारी याच मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादामुळे रागाच्या भरात तीने सलमानवर उकळतं पाणी ओतलं. या घटनेत सलमानचा चेहरा वीस टक्के भाजला आहे.
मी खूप धार्मिक पद्धतीने जीवन जगणारा व्यक्ती आहे पण माझी बायको ओपन माइंडेड आहे. शुक्रवारी आमच्या दोघांमध्ये भांडण झाली होती. त्यानंतर मी झोपायला गेलो. त्यावेळी तीने माझ्या चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं. मी ओरडायला सुरू केल्यावर आजूबाजूची लोक आली आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं, अशी माहिती सलमान यांने दिली आहे.
याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अलीगडचे एसपी आशुतोष द्विवेदी यांनी दिली आहे.