मुलीच्या भेटीसाठी जाणारा पिता अपघातात ठार
By admin | Updated: December 27, 2015 00:12 IST
नशिराबादजवळील घटना : ट्रकने दिली दुचाकीला धडक
मुलीच्या भेटीसाठी जाणारा पिता अपघातात ठार
नशिराबादजवळील घटना : ट्रकने दिली दुचाकीला धडकनशिराबाद : दहिगाव ता.पाचोरा येथे मुलीला भेटण्यासाठी जात असलेल्या ज्ञानदेव शंकर कोळी (वय ६३,रा.फेकरी ता.भुसावळ) यांच्या दुचाकीला समोरुन येणार्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२.४५ वाजता नशिराबादजवळील महामार्गावरील मन्यारखेडा जकात नाक्याजवळ झाला. ट्रकचालक ओमप्रकाश हतरामजी जाट (रा.बिकानेर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.ज्ञानदेव कोळी हे रेल्वेचे सेवानिवृत्त चालक होते.शनिवारी ते दहिगाव येथे मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.टी.१३३४) जात असताना दुपारी १२.४५ वाजता मन्यारखेडा फाट्याजवळ जळगावकडून अकोल्याला जाणार्या ट्रकने (आर.जे.०७ जी.ए.३६३७) त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच अंत झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सार्थक नेहते यांनी तातडीने घटनास्थळ गाठून कोळी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेतली. तेथे प्रचंड आक्रोश केला. ज्ञानदेव यांचे नातू चेतन देविदास कोळी यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.