शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वडील तुरुंगात गेले, आईने वाऱ्यावर सोडले; ९ वर्षांच्या चिमुरड्यावर रस्त्यावर राहण्याचे दिवस आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 14:23 IST

homeless Boy living on Footpath : बालपणीचा काळ सुखाचा, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे खरं ठरत नाही. आई-वडिलांविना एकटे पडण्याची वेळ जेव्हा मुलांवर येते तेव्हा त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळत असतो.

लखनौ - बालपणीचा काळ सुखाचा, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे खरं ठरत नाही. आई-वडिलांविना एकटे पडण्याची वेळ जेव्हा मुलांवर येते तेव्हा त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळत असतो. असाच प्रकार एका नऊ वर्षिय मुलासोबत घडला आहे. अंकित असे या मुलाचे नाव असून, आई-वडिलांपासून दुरावल्याने त्याचे बालपण कोमेजून गेले आहे. आपले आई-वडील कोण, याची माहिती त्याला सांगता येत नाही. मात्र आपले वडील तुरुंगात आहेत आमि आईने त्याला एकटे सोडले आहे, एवढे तो सांगतो. मात्र मात्र एवढ्या छोट्या वयातही अंकितला स्वावलंबित्वाचे वळण लागले आहे. तो फुगे विकून चहाच्या दुकानावर काम करून उदरनिर्वाह करतो.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षांपासून अंकित हा अशाच प्रकारे आपले जीवन जगत आहे. तो दिवसभर काम करतो आणि त्यातून मिळालेल्या कमाईमधून तो स्वत:च्या आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या कुत्र्याच्या उदरभरणाची सोय करतो. तो ज्या चहाच्या दुकानात काम करायचा त्या दुकानाच्या मालकाने सांगितले की, अंकित जेवढा वेळ दुकानात काम करायचा तेवढा वेळ त्याचा कुत्रा एका कोपऱ्यात बसून राहायचा. गरजू असूनही अंकित काहीही फुटकात घेत नसे. अगदी आपल्या कुत्र्यासाठीही कधी कुणाकडून दूध घेत नसे.काही दिवसांपूर्वी एका बंद दुकानाबाहेर कुत्र्याला आपल्या पांघरुणाखाली घेऊन झोपलेल्या एका छोट्या मुलाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने या मुलाचा शोध सुरू केला होता. अखेर सोमवारी पोलिसांनी या मुलाला शोधून काढले होते. सध्या हा मुलगा मुझफ्फरनगर पोलिसांच्या देखरेखीखाली आहे.याबाबत एसएसपी अभिषेक यांनी सांगितले की, आम्ही या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी अंकितचे फोटो आजूबाजूच्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाठवले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या विनंतीवरून एक खासगी शाळा त्याला मोफत शिक्षण देण्यास तयार झाला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत