वडिलांनी आंबे तोडण्यापासून रोखले, शेजा-यांनी मुलीला जाळले

By Admin | Updated: June 14, 2015 15:37 IST2015-06-14T15:26:11+5:302015-06-14T15:37:20+5:30

आंबे तोडण्यापासून रोखल्याने संतापलेल्या शेजा-यांनी बागमालकाच्या मुलीला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील फतेहपूर येथे घडली आहे.

The father stopped the mangoes, the Sheja girls burnt the girl | वडिलांनी आंबे तोडण्यापासून रोखले, शेजा-यांनी मुलीला जाळले

वडिलांनी आंबे तोडण्यापासून रोखले, शेजा-यांनी मुलीला जाळले

>ऑनलाइन लोकमत 
फतेहपूर, दि. १४ - आंबे तोडण्यापासून रोखल्याने संतापलेल्या शेजा-यांनी बागमालकाच्या मुलीला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील फतेहपूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
फतेहपूर जिल्ह्यातील खेशान या गावात शिवभूषण व त्यांचे कुटुंबीय राहत असून शिवभूषण यांच्या घराबाहेर आंब्याची झाडे आहेत. बुधवारी शिवभूषण यांच्या शेजारी राहणारे दोघे तरुण आंबे तोडत होते. शिवभूषण यांनी त्या तरुणांना आंबे रोखण्यापासून रोखले. यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे संतापले. शनिवारी शिवभूषण हे शेतात कामासाठी गेले होते तर कुटुंबातील अन्य सदस्य लग्नासाठी बाहेर गेले होते. या दरम्यान शिवभूषण यांची १७ वर्षांची मुलगी घरात एकटीच होती. याचा फायदा शिवभूषण यांच्या शेजारी राहणारे चौघे जण जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. शिवभूषण यांच्या मुलीला बेदम मारहाण केली व यानंतर तिला जीवंत जाळून दिले. या आगीत गंभीर भाजलेल्या त्या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 

Web Title: The father stopped the mangoes, the Sheja girls burnt the girl