शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 3:47 PM

UPSC2019 प्रदीप सिंह यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करतात. प्रदीप यांचे स्वप्न मोठे होते. अशातच त्यांनी  दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. ते 2017 मध्ये दिल्लीला आले होते. याचठिकाणी त्यांनी कोचिंग क्लास लावला.

युपीएससी परीक्षा 2019 चा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये प्रदीप सिंह याने ऑल इंडिया रँक वन मिळविली आहे. मात्र, याच यादीमध्ये 26 व्या नंबरवर आणखी एक प्रदीप सिंह नाव आहे. हे प्रदीप सिंह आयआरएस अधिकारी म्हणून आपली सेवा देत आहेत. मात्र, त्यांची संघर्ष कहानी खूप वेगळी आहे. आई वडिलांच्या शिरपेचात या प्रदीप सिंहने मानाचा तुरा खोवला आहे. 

या प्रदीप सिंहांनी CSE 2018 मध्ये ऑल इंडिया रँक मिळविली होती. 22 वर्षे वय असताना पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही परिक्षा पास केली होती. यानंतर एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, मी जेवढा संघर्ष केला त्यापेक्षा अधिक संघर्ष माझ्या आई-वडिलांनी केला आहे. प्रदीप सिंह यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करतात. प्रदीप यांचे स्वप्न मोठे होते. अशातच त्यांनी  दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. ते 2017 मध्ये दिल्लीला आले होते. याचठिकाणी त्यांनी कोचिंग क्लास लावला. दिल्लीला येण्याचा खर्च काही कमी नव्हता. यामुळे आर्थिक संकट मोठे होते. मात्र, आई-वडिलांनी यावर मात केली. अभ्यासाआड हे संकट येऊ न देता त्यांनी घर विकले. 

प्रदीप यांच्या वडिलांनी ANI ला सांगितले की, मी इंदौरला एका पेट्रोल पंपावर काम करतो. मी मुलांना नेहमीच चांगले शिक्षण देऊ इच्छित होतो. कारण ते भविष्यात चांगले काहीतरी करू शकतील. प्रदीपने सांगितले की त्याला युपीएससी परिक्षा द्यायची आहे. माझ्य़ाकडे तेवढे पैसे नव्हते. मात्र, मुलाच्या शिक्षणासाठी मी घर विकले, त्या काळात मला आणि कुटुंबाला मोठ्या हालअपेष्टा सहन करव्या लागल्या. मात्र, आज मी खूप खूश आहे. 

क्लासची फी 1.54 लाखप्रदीप य़ांच्या कोचिंग क्लासची फी दीड लाख रुपये होती. तसेच इतर खर्च होताच. इंदौरचे घरच आमची एकमेव मालमत्ता होती. वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता ते घर विकले. मला याची कल्पना नव्हती पण जेव्हा माझ्या शिक्षणासाठी घर विकल्याचे समजले तेव्हा माझाही आत्मविश्वास वाढला. तसेच मनोमन तयारी करत युपीएससीची परिक्षा कोणत्याही परिस्थितीत पास करायचीच असा निश्चय केल्याचे प्रदीप सिंह यांनी सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

UPSC IAS, IPS परीक्षेचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशभरात टॉपर

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा