जमीन विकायला गेलेल्या सासऱ्याला सुनांनी लाथाबुक्क्यांनी बदडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 19:42 IST2019-08-06T19:41:56+5:302019-08-06T19:42:49+5:30

मनी राम यांनी 21 एकर जागेचा व्यवहार 28 लाखांमध्ये केला होता.

father in law beaten by daughters in law for selling land | जमीन विकायला गेलेल्या सासऱ्याला सुनांनी लाथाबुक्क्यांनी बदडले

जमीन विकायला गेलेल्या सासऱ्याला सुनांनी लाथाबुक्क्यांनी बदडले

डबवाली : सिरसाच्या गोरिवाला गावातील उपतहसील कार्यालयात सोमवारी दोन सुनांनी सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. तेथे उपस्थितांनी बघ्याची भुमिका घेतली. यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर चौकशीत खरा प्रकार समोर आला आहे.


मनी राम यांनी 21 एकर जागेचा व्यवहार 28 लाखांमध्ये केला होता. खरेदीदाराने चेकद्वारे ही रक्कम दिली होती. सोमवारी या जमिनीची नोंदणीही होणार होती. यासाठी मनी राम नोंदणी कार्यालयात गेले होते. नोंदणी होण्याआधीच मनीराम यांच्या दोन सुना तहसील कार्यालयात पोहोचल्या.


दोघींनीही नायब तहसीलदार यांना एक पत्र देत जमीनीचे प्रकरण न्यायालयात सुरु असल्याचे सांगितले. तसेच पुढील सुनावणीची तारिख 9 सप्टेंबर आहे. आज नोंदणी झाली तर आपले नुकसान होईल आणि भरपाई करणे शक्य नाहीय. यामुळे त्यांनी तहसीलदारांना नोंदणी न करण्याचे आवाहन केले. मात्र, तहसीलदारांनी ही मागणी फेटाळली आणि जमीनी संबंधी कागदांवर शेरा ओढला. या दरम्यान व्यवहार पूर्ण होण्यासाठी फोटो नोंदणी शिल्लक होती. यामुळे संतापलेल्या सुनांनी थेट सासऱ्याच्या बखोटीला धरून धक्के मारत मुख्य प्रवेशद्वारावर नेत जमिनीवर आदळले. यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 


इकडे तहसीलदारांनी घेतलेल्या भुमिकेवर शंका उपस्थित झाल्यावर त्यांनी खुलासा केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी स्टे न दिल्याने नोंदणी रोखू शकत नव्हतो. यामुळे कागदपत्रांवर शेरा ओढला होता. आपण सव्वा पाच वाजेपर्यंत वाट पाहत होतो. मात्र, मनी राम फोटोसाठी आला नाही. त्यानंतर मला समजले की सुनांनी त्याला मारहाण केली आहे. यामुळे पोलिसांना बोलावले. वादामुळे जमीन व्यवहाराची नोंदणी आज झाली नाही, असे नायब तहसीलदार महेंद्र कुमार यांनी सांगितले. 
 

Web Title: father in law beaten by daughters in law for selling land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.