वडिलांनी नाग मारला; संतापलेल्या नागिणीनं 24 तासांत घेतला थरकाप उडवणारा बदला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:28 IST2022-04-09T13:27:12+5:302022-04-09T13:28:03+5:30
ही घटना बुदनी तालुक्यातील जोशीपूर गावातील आहे...

वडिलांनी नाग मारला; संतापलेल्या नागिणीनं 24 तासांत घेतला थरकाप उडवणारा बदला!
सीहोर - नाग-नागिण (Nag-Nagin) जोडीतील खाद्याला मारले, तर दुसरा साप बदला घेतो, असे आपण अनेकवेळा ऐकले असेल. काहीसा असाच प्रकार मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये (Madhya Pradesh Sehore) घडल्याचे समोर आले आहे. येथे एका बालकाचा साप चावल्याने मृत्यू झाला (death by snake bite). गावकरी याला सापाचा बदला, म्हणत आहेत.
सिहोर येथील एका व्यक्तीने नाग मारला होते आणि याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या मुलाचा दुसरा साप चावल्याने मृत्यू झाला, असे बोलले जात आहे. ही घटना बुदनी तालुक्यातील जोशीपूर गावातील आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्यवसायाने मजूर असलेल्या किशोरी लाल यांच्या घराजवळ गुरुवारी नाग दिसून आला होता. किशोरीलालने त्याला मारले आणि नंतर जंगलात फेकून दिले. त्याच दिवशी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या किशोरीलाल यांचा मुलगा रोहित (१२) याला साप चावला.
यानंतर रोहित रडत जागा झाला आणि त्याने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर घरच्यांनी सर्वप्रथम घरगुती उपचार करून पाहिले. मात्र, रोहितमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला नर्मदापुरम येथील रुग्णालयात नेण्यात आले. येथून प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला भोपाळला रेफर केले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला भोपाळला न नेता पुन्हा गावात आणले. यानंतर पुन्हा घरगुती उपचार सुरू झाले, मात्र त्याला वाचवता आले नाही.
गावकऱ्यांनी नागीनही मारली -
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच रात्री त्यांनी नागीन शोधून मारली. नागाच्या मृत्यूचा बदला नागिणीने घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही रोहितचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे म्हणण्यात आले आहे.