शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:12 IST

Crime News: प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक वादातून वडील आणि त्यांच्या दोन छोट्या मुलांचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची अजब घटना घडली आहे.

वडील आणि त्यांच्या दोन छोट्या मुलांचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची अजब घटना घडली आहे. या अपहरणकर्त्यांनी हरयाणामधील गुरुग्राम येथील ऑटोचालक मनोज आणि त्याच्या दोन मुलांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर हे अपहरणकर्ते मयूर आणि लक्ष्य या दोन मुलांना बोलेरो गाडीतून अज्ञात ठिकाणी नेत होते. यादरम्यान, बरेली-रामपूर महामार्गावर त्यांच्या बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात मनमोहन, सिकंदर आणि विशेष या अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रिंस नावाचा चौथा अपहरणकर्ता जखमी झाला आहे. कौटुंबिक वाद आणि प्रेमप्रकरणातून हे अपहरणनाट्य घडलं होतं. तसेच आरोपींनी खंडणी आणि धमकावण्याचे कृत्य केले होते, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासामधून समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार रविवारी संध्याकाळी एका भरधाव बोलेरो कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना बरेलीमधील सीबीगंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ही धडक एवढी भीषण होती की, यात कारचा चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. अपघातग्रस्त गाडीमध्ये तीन तरुणांचे मृतदेह अडकले होते. तर एक तरुण आणि दोन मुले बेशुद्धावस्थेत सापडले. पोलिसांनी जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले. मात्र घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांना अपहरणाचा संशय आला.

त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शनिवार ४ एप्रिल रोजी गुरुग्राममधील डीएलएफ फेज-१ परिसरातून ऑटो चालक मनोज आणि त्याचे मयूर आणि लक्ष्य हे दोन मुलगे यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली. तसेच अपहरणकर्त्यांनी माझ्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मनोजची पत्नी पूजा हिने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी नियोजनबद्ध तपास करत अपहरणकर्त्यांचे षडयंत्र हाणून पाडले.

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेला मुख्य अपहरणकर्ता मनमोहन हा फरीदपूर येथील रहिवासी नत्थू याचा मुलगा होता. त्याचे मनोजच्या भाचीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. तसेच मनमोहन याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र मनोजचा या लग्नाला विरोध होता. यामुळेच मनमोहन याने मनोज आणि त्याच्या दोन मुलांचं अपहरण केलं होतं. दरम्यान, पोलिसांनी मनोज याची फरीदपूर येथील नत्थूच्या घरातून सुखरूप सुटका केली आहे. तर मनोजचे दोन्ही मुलगे भीषण अपघातात सुदैवाने बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता या प्रकरणी चौथा आरोपी प्रिंस याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Kidnapping turns fatal: Accident kills abductors, victims rescued.

Web Summary : Haryana kidnapping plot foiled after a deadly accident killed three abductors. A father and his two sons were kidnapped due to a family dispute. The victims were rescued; the fourth abductor is in custody.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा