मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:33 IST2025-11-05T11:33:20+5:302025-11-05T11:33:54+5:30
Mirzapur Train Accident: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनजवळ कालका मेल एक्स्प्रेसने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या ६ भाविकांना चिरडले. दुर्घटनेची संपूर्ण माहिती वाचा.

मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
पवित्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनजवळ एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडत असताना एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेने सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. ते चोपन-प्रयागराज पॅसेंजर ट्रेनमधून चुनार स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उतरले होते. स्थानकावर उतरल्यानंतर, पुलाचा वापर न करता, घाईगडबडीत या भाविकांनी थेट रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी, विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या हावडा-कालका नेताजी मेल एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत हे चारही भाविक चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी मोठी आरडाओरड आणि गोंधळ निर्माण झाला. मृतदेहाचे अवयव विखुरले गेल्यामुळे हे दृश्य अत्यंत भयानक होते. घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफ चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले.