Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:24 IST2018-11-15T11:14:11+5:302018-11-15T12:24:54+5:30

प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.

Fashion Designer Murder : Delhi : 53-year-old fashion designer and her servant found murdered in her house in Vasant Kunj | Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत

Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत

नवी दिल्ली - प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या हत्येमुळे राजधानी नवी दिल्लीत खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री (14 नोव्हेंबर) वसंतकुंज येथे 53 वर्षीय फॅशन डिझायनर आणि तिच्या नोकराची हत्या करण्यात आली आहे. माला लखानी असे हत्या करण्यात आलेल्या फॅशन डिझायनरचे नाव आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. दरम्यान, या दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.  

याप्रकरणी कसून पोलीस चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माला लखानी नवी दिल्लीतील अतिशय प्रसिद्ध फॅशन डिझायनर होत्या. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोघांचीही चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली.  हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव राहुल असं असून तो टेलर असल्याची माहिती समोर आली आहे. या दुहेरी हत्याकांडप्रकरणी राहुलसहीत दोन तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

हत्या केल्यानंतर आरोपी माला लखानी यांची महागडी कार घेऊन फरार झाले होते. दरम्यान, चोरीच्या उद्देशानं हे हत्याकांड करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. 












 



 

Web Title: Fashion Designer Murder : Delhi : 53-year-old fashion designer and her servant found murdered in her house in Vasant Kunj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.