शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

Farooq Abdullah: "काश्मीरी पंडितांना वाचवायचे असेल तर काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला"- फारूक अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 2:34 PM

Farooq Abdullah on The Kashmir Files: "मुसलमान हिंदूला मारुन त्याच्या रक्ताने माखलेले तांदूळ त्याच्याच बायकोला खायला सांगतो. आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का?''

श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध 'द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाशी जोडला आहे. ''काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील, तर सरकारने द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर बंदी घालावी,'' असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. 

मीडियाशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, ''सध्या देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच काश्मीरमधील मुस्लिम तरुणांमध्ये संताप पसरतो आहे. मी सरकारला विचारले की, काश्मीर फाइल्स चित्रपट खरा आहे का? मुसलमान आधी हिंदूला मारेल, मग त्याचे रक्त तांदळात टाकून त्याच्याच बायकोला खायला सांगेल. हे होऊ शकतं का? आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का?'

पाहा फारुख अब्दुल्ला काय म्हणाले:-

लष्कर-ए-इस्लामने धमकी दिलीगेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले अचानक वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांच्या आदेशानुसार खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी लष्कर-ए-इस्लामनेही धमकी दिली होती. "तुमचा बचाव दुप्पट-तिप्पट करा. काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर टार्गेट किलिंगसाठी तयार व्हावे," असे म्हटले होते.

निशाण्यावर काश्मिरी पंडितपुलवामा येथील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना ही धमकी देण्यात आली आहे. या ट्रान्झिट निवासस्थानात राहणारे बहुतेक काश्मिरी पंडित सरकारी नोकरी करतात. हवाल ट्रान्झिट हाऊसिंगच्या अध्यक्षांना उद्देशून हे पोस्टर लिहिले आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून काश्मिरी पंडितांच्या परतीचे दावे केले जात आहेत, मात्र गेल्या तीन वर्षात पूर्वीपासून राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनाही राहू दिले जात नाही आहे. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्सJammu Kashmirजम्मू-काश्मीर