शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीओकेआधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, फारुख अब्दुल्ला यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 09:39 IST

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे.  फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आव्हान देत म्हटले आहे की, ''हिंमत असल्यास श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा''. कठुआच्या दौ-यावर असताना फारुख अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी पीओके हा पाकिस्तानचा भाग असून तो कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे विधान केले होते. यावरून त्यांच्यावर चौफेर टीकादेखील झाली होती. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानाचाच हिस्सा आहे आणि यावरुन भारत-पाकिस्तानामध्ये कितीही युद्ध झाले तरीही ही स्थिती बदलणार नाही, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले होते.

''पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही''काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले होते. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात अब्दुल्ला म्हणाले होते की, "कधीपर्यंत निरपराध लोकांच्या रक्ताचे पाट वाहत राहणार आणि कधीपर्यंत आम्ही पाकव्याप्त काश्मीर आमचे आहे म्हणून सांगत राहणार. काश्मीर यांच्या बापाचे नाही आहे."  "काश्मीरची विभागणी होऊन 70 वर्षे झाली. नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तान आहे आणि हे हिंदुस्तान आहे. 70 वर्षांत तो भाग हे परत मिळवू शकलेले नाहीत. तरीही आता पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग आहे म्हणून सांगताहेत,"असेही अब्दुल्ला पुढे म्हणाले. 

अब्दुल्ला यांच्या या विधानाचा देशभरात विरोध सुरू असतानाच त्यांनी आता पुन्हा तिरंगा फडकवण्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. रविवार अब्दुल्ला कठुआच्या दौ-यावर होते, यावेळी येथील लोकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना काळे झेंडे दाखवले. अब्दुल्ला यांच्याविरोधात निदर्शनं करणा-या लोकांनी 'हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय', अशी नारेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सरकारच्या पीओकेवर तिरंगा फडकवण्याच्या विधानाची खिल्ली उडवली.

येथील जनतेला संबोधित करताना अब्दुल्ला म्हणाले की, ''पीओकेपूर्वी भारत सरकारनं श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा''. केंद्र सरकारची खिल्ली उडवत अब्दुल्ला पुढे असेही म्हणाले की, ''येथे तिरंगा फडकवू शकत नाहीत आणि पीओकेवर तिरंगा फडकवण्याच्या गोष्टी करत आहेत''.   दरम्यान,  फारुख अब्दुल्ला यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरJammu and Kashmir National Conferenceजम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा