शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी फाडले पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:47 IST

भाजप सरकारमुळे या शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पंजाबमधील शेतकरी मोदी यांना कदापि माफ करणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

- बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंदीगड :  पंजाबमधील  फिरोजपूरमध्ये बुधवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला विरोध करीत शेतकऱ्यांनी भडानावाला गावात पोलिसांनी उभारलेले नाके तोडले.  गावागावात लावण्यात आलेले पंतप्रधान मोदी यांचे  पोस्टर्स फाडले जात आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. आम्ही मोदी यांची रॅली होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी नेते जसबीर सिंग जस्सा यांनी सांगितले की,  माछीवाडामध्ये काही  लोक मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स लावत होते. त्यांना रोखण्यात आले.  त्यांनी लावलेले पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स फाडून फेकले.  आम्ही मोदींची रॅली होऊ देणार नाही. सोबत शिदोरी आणि अंथरुण-पांघरुण घेऊन शेतकरी फिरोजपूरमध्ये दाखल होत आहेत. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  वर्षभर चाललेल्या आंदोलनादरम्यान ७५० शेेतकरी शहीद झाले. 

भाजप सरकारमुळे या शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पंजाबमधील शेतकरी मोदी यांना कदापि माफ करणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वर्षांनंतर पंजाबला भेट देत आहेत.  त्यांच्या पंजाब दौऱ्याला काही शेतकरी संघटना विरोध करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर  फिरोजपूर जिल्ह्यात १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पंतप्रधानांची आज पहिली रॅली n    केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच रॅली पंजाबमध्ये ५ जानेवारी रोजी होत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी येत आहेत. n    एक वर्षापेक्षा अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपची परिस्थिती फार चांगली नाही. n    शिरोमणी अकाली दलापासून वेगळे झाल्यानंतर भाजप प्रथमच विधानसभा निवडणूक लढविणार आहे. मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग ढींढसा उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी