शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सरकारच्या पत्रावर शेतकरी आज घेणार निर्णय; संयुक्त किसान मोर्चाची बैठक, पुढील रणनीती ठरविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 2:04 AM

Farmer Protests : कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे.

-   विकास झाडे

नवी दिल्ली : सरकारने शेतकरी संघटनांना पाठविलेल्या पत्रावर संयुक्त किसान मोर्चा बुधवारी सकाळी बैठक घेत असून प्रत्युत्तर लेखी देण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. दरम्यान आज आंदोलनाच्या २७ व्या दिवशीही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जाम केलेत. एका तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे.कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून लेखी उत्तर पाठविले जाणार आहे. उद्याच्या बैठकीत तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि ‘एमएसपी’वर कायदा करावा हे निर्णय होेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन ऐन कडाक्याच्या थंडीत दीर्घकाळ चालू शकते. सरकारप्रमाणे आपणही एक पाऊल मागे घ्यावे आणि तोडगा काढावा असेही काही शेतकरी नेते मत मांडू शकतात. दरम्यान, सरकारने आणलेले कायदे चांगले असल्यामुळे विरोध करू नका, असेही काही संघटना सांगत आहेत.

कायद्याला समर्थनगौतमबुद्ध नगर येथे कायद्याच्या समर्थनार्थ ट्रक्टर रॅली काढण्यात आली. या कायद्याला आमचे समर्थन आहे. विरोध करणाऱ्यांनी या कायद्याचा सुक्ष्म अभ्यास करावा असे रॅलीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

पगडी आणि खट्टरहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्ट यांना अंबाला येथे शेतकºयांच्या रोष सहन करावा लागला. मुख्यमंत्री येणार म्हणून शेतकरी काळे झेंडे दाखवत शांततेत निदर्शने करीत होते. पोलिसांनी त्यांना शेतकाऱ्यांवर धक्काबुक्की केली. त्यात एका शेतकºयाची पगडी जमिनीवर पडली. पगडी पडल्यानंतर शेतकºयांचा राग अनावर झाला. त्यांनी अ‍ॅम्बुलन्स वगळता मुख्यमंत्र्याच्या काफील्यातील प्रत्येक गाडीवर लाठ्या हाणल्यात. त्यात खट्टर यांची गाडीही सुटू शकली नाही.

कॅनडाचा गायक सीमेवरभारतीय मूळ असलेले कॅनडाचे गायक जैजी हे सिंघू सीमेवर पोहचले. त्यांनी आंदोलनाला समर्थन देत मार्गदर्शन केले.

उपोषणात मंत्रीही...शेतकºयांनी सोमवारपासून २४ तासांचे श्रृंखला उपोषण सुरू केले आहे. पंजाबचे मंत्री विजय इंदर सिंगला यांनी उपोषणाला समर्थन दिले आहे. त्यांनी ट्वीट करीत एक दिवस शेतकऱ्यांसोबत उपोषणावर बसणार असल्याचे सांगितले.

राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणारकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे २ कोटी सह्यांचे निवेदन यावेळी ते राष्ट्रपतींना देणार आहेत. 

भ्रम निर्माण करीत आहे सरकारसरकारने शेतकरी नेत्यांना पत्र पाठविल्यानंतर किसान मजदूर संघर्ष समितीचे नेता श्रवण सिंह पंढेर यांनी सरकारची ही खेळी आहे. सामान्य नागरीकांच्या मनात शेतकऱ्यांबाबत रोष निर्माण करून शेतकऱ्यांची फसगत करण्याचा त्यांचा डाव आहे. आम्हाला कायद्यात संशोधन नकोच आहे, हे तिन्ही कायदे मागे घ्यावे लागतील, तेव्हाच आम्ही माघारी फिरू असे सांगितले.

एका शेतकऱ्याचा मृत्यूदिल्ली-हरियाणावरील टीकरी सीमेवर आंदोलनात सहभागी झालेला ३१ वर्षीय हरमिंदर सिंह या शेतकऱ्याचा आंदोलनातून पंजाबला परतत असताना अपघाती मृत्यू झाला. हा तरुण जांगपूर, लुधियाना येथील निवासी आहे. शेतकरी आंदोलनातील संबंधित हा ३४ वा मृत्यू आहे.

समंजस शेतकरीगाझियाबाद - दिल्ली मार्ग अडविल्यानंतर सामान्य नागरीकांना अडचण निर्माण झाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर शेतकऱ्यांनी हा रस्ता रहदारीस मोकळा करुन देत आपल्यातील समंजसपणाचा परिचय करुन दिला.

पुन्हा जामदररोज शेतकरी कुठले ना कुठले रस्ते जाम करीत आहे. मंगळवारी चिल्ला सीमा बंद केल्याने नोएडा-गाझियाबाद रस्ता बंद झाला. महामाया उडाणपुलावर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवले त्यामुळे इथेही जाम लागला. शेतकऱ्यांनी धरणे दिले. राज्यसभा खासदार सुरेंद्र नागर यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. दिल्ली-मेरठ रस्ता बंद करण्यात आला. भोपरा, ज्ञानी, महाराजपूर सीमा, कोशांबी, वैशाली आणि लिंक रोडवर जाम लागला आहे.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीFarmerशेतकरी