सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:17+5:302015-08-18T21:37:17+5:30

लातूर : सावकाराच्या त्रासाला कंटाळून लातूर तालुक्यातील शिराळा येथील एका शेतकर्‍याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली़ याबाबत मुरुड पोलिसात सावकाराविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शेतकर्‍याला संबंधीत सावकाराकडून मारहाण व शिवीगाळही झाली होती, असे मुरुड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़

Farmer's suicide in tears of larceny | सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

तूर : सावकाराच्या त्रासाला कंटाळून लातूर तालुक्यातील शिराळा येथील एका शेतकर्‍याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली़ याबाबत मुरुड पोलिसात सावकाराविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शेतकर्‍याला संबंधीत सावकाराकडून मारहाण व शिवीगाळही झाली होती, असे मुरुड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़
शिराळा येथील शेतकरी परमेश्वर भागवत चोरमले (३५) यांनी पेरणीसाठी गावातीलच सचिन विश्वंभर काळे यांच्याकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते़ गेल्या महिनाभरापासून काळे यांनी वसुलीसाठी तगादा लावला होता़ शिवाय, वसुलीसाठी शेतकरी चोरमले यांना शिवीगाळ करुन मारहाणही केली होती़ तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली होती़ सावकाराच्या या त्रासाला कंटाळून शेतकरी परमेश्वर चोरमले यांनी १२ ऑगस्ट रोजी दुपारी २़३० वाजण्याच्या सुमारास शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन केले़ त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मयत शेतकरी परमेश्वर चोरमले यांच्या पत्नी आशा चोरमले यांनी मुरुड पोलिसात दिली़ त्यानुसार मुरुड पोलिसात सचिन विश्वंभर काळे याच्याविरुद्ध कलम ३०६ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गिते करीत आहेत़

Web Title: Farmer's suicide in tears of larceny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.