शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, २ तास बाथरूममध्ये लपून वाचवला जीव; ASI नं सांगितला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 12:23 IST

पोलिसानं कथन केला भयानक अनुभव

ठळक मुद्देअतिरिक्त कुमक आल्यानंतर वाचला जीवशेतकरी आंदोलनातील काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर केलं होतं हिंसक आंदोलन

प्रजासत्ताक दिनीदिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर काही आंदोलकांनी लाल किल्ल्यातही प्रवेश करत मोडतोड केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या आंदोलनानं देशाची मान शरमेनं खाली घातल्याचंही म्हटलं जात आहे. लाल किल्लात शिरलेल्या जमावानं केलेल्या तोडफोडीचं चित्रही आता समोर आलं आहे. याचदरम्यान, आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं २ तास बाथरूममध्ये लपून या जमावापासून कसा जीव वाचवला याचा भयानक अनुभव कथन केला आहे. दिल्लीतील पोलीस ठाण्यातील एएसआय रमेश मंगळवारी लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यावर तैनात होते. शेतकऱ्यांचं आदोलन कशाप्रकारे लाल किल्ल्याच्या दिशेनं वळत आहे याची माहिती त्यांना देणअयात आली होती. ते अन्य सुरक्षा रक्षकांप्रमाणेच सुरक्षेचं काम पाहत होते. त्याच वेळी काही आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. एएसआय रमेशदेखील आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांना थांबवण्यासाठी पुढे सरसावले. परंतु आंदोलक त्यांच्याच दिशेने पुढे आले. जीव वाचवण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह लाल किल्ला परिसरात असलेल्या एका शौचालयात शिरले. जवळपास दोन तास आंदोलकांनी ते शौचालयातून बाहेर पडण्याची वाट पाहिली. यादरम्यान त्यांनी गेटही तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते तोडता आलं नाही. ज्यावेळी पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर येता आलं, असा भीतीदायक अनुभव त्यांनी सांगितला. छावणीचं स्वरूपशेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्कर दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव उपस्थित होते. दिल्लीतील संवेदनशील स्थळांवर निमलष्कर दलाचे जवान तैनात केले जातील, असे गृहमंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले. त्यानंतर, लागलीच निमलष्करी दलाच्या सुमारे १५ ते २० कंपन्या म्हणजे १५०० ते २००० जवान दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तासाठी राजधानीत यापूर्वीच निमलष्कराचे ४५०० जवान तैनात आहेत. आता, लाल किल्ला परिसराला छावणीचं रुप प्राप्त झालं असून निमलष्करी दलाचे सैनिक शस्त्र घेऊन तैनात आहेत. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीPoliceपोलिसRepublic Dayप्रजासत्ताक दिन