शेतकऱ्यांचे 'रेल रोको' आंदोलन सुरू; पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर बसले शेतकरी, गाड्या रखडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 02:33 PM2024-03-10T14:33:18+5:302024-03-10T14:42:26+5:30

शंभू सीमेवर शेतकरी आंदोलक रेल्वे रुळावर बसले आहेत.

Farmers' 'Rail Roko' movement started, tracks jammed, trains stopped at many places in Punjab | शेतकऱ्यांचे 'रेल रोको' आंदोलन सुरू; पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर बसले शेतकरी, गाड्या रखडल्या

शेतकऱ्यांचे 'रेल रोको' आंदोलन सुरू; पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर बसले शेतकरी, गाड्या रखडल्या

नवी दिल्ली: आज देशभरात शेतकऱ्यांनी १२ ते ४ या वेळेत चार तास रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. विशेषत: पंजाबमध्ये जाणाऱ्या लोकांना आज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

शंभू सीमेवर शेतकरी आंदोलक रेल्वे रुळावर बसले आहेत. मोहाली रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. सरसिनी रेल्वे ट्रॅकवरही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. या आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रखडल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी संघटनांच्या 'रेल रोको' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमधील देविदासपुरा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: Farmers' 'Rail Roko' movement started, tracks jammed, trains stopped at many places in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.