शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर मार्चवरील सुनावणी तहकूब, न्यायालय म्हणालं,"दिल्लीत कोणी यायचं पोलिसांनी ठरवावं" 

By जयदीप दाभोळकर | Updated: January 18, 2021 12:29 IST

दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केली होती याचिका

ठळक मुद्देदिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केली होती याचिकादिल्लीत कोणी यायचं, कोणी नाही पोलिसांनी ठरवावं, न्यायायलाचं म्हणणं

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. एकीकडे सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे तर दुसरीकडे शेतकरी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली होती. तसंच समितीही स्थापन केली होती. आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु यावरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आका २० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या ट्रॅक्टर मार्चला स्थगिती देण्यासाठी ही याचिका दाखल केली होती. प्रशासनानं काय करावं किंवा काय करू नये हे न्यायालय ठरवणार नसल्याचंही सुनावणीदरम्यान न्यायालयानं स्पष्ट केलं. "शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च अवैध असेल यावेळी दिल्लीत ५ हजार जण प्रवेश करण्याची शक्यता आहे," असं मत अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मार्च काढणाऱ्या शेतकऱ्यांनी या मार्चच्या रंगीत तालमीसाठी १९ जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. टिकरी सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी याची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता या मार्चचा रंगीत तालीम करण्यात येणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली होती. तसंच माहिती घेण्यासाठी चार सदस्यांची समितीही नेमली होती. यावेळी केंद्र सरकार स्वत: या कायद्यांवर स्थगिती आणेल का न्यायालयानं त्यावर स्थगिती आणावी असाही प्रश्न करण्यात आला होता. न्यायालयानं नेमलेल्या समितीचा शेतकऱ्यांकडून विरोधही करण्यात आला आहे. त्यातील सर्व सदस्य सरकारचे समर्थक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस