शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

Farmer's Protest : आजपासून १०० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची विक्री? संयुक्त किसान मोर्चाने सांगितले व्हायरल मेसेजमागचे सत्य

By बाळकृष्ण परब | Updated: March 1, 2021 10:09 IST

Farmers Selling milk at Rs 100 per liter from today : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. (Farmers Protest) या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांकडून विविध माध्यमातून केंद्र सरकारची कोंडी करण्यात येत आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. (Farmers Protest) या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांकडून विविध माध्यमातून केंद्र सरकारची कोंडी करण्यात येत आहेत. त्यातच आता १ मार्चपासून शेतकऱ्यांकडून १०० रुपये प्रतिलिटर दराने दूध विक्री (milk at Rs 100 per liter) करण्याचा इशार देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आता संयुक्त किसान मोर्चाने दूध दराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Selling milk at Rs 100 per liter from today?  Samyukta Kisan Morcha Says this is Rumors on social media)संयुक्त किसान मोर्चाने रविवारी सांगितले की, त्यांच्याकडून दूध विक्री करण्याचे किंवा १०० रुपये प्रतिलीटर दराने दूध विक्री करण्याबाबत कुठल्याही प्रकारचे आवाहन करण्यात आलेले नाही. आमच्या नावावर सोशल मीडियावर चुकीचे व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दुधाचे दर वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या नावावर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन किसान मोर्चाकडून करण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत होता. त्यामध्ये जर पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलीटर पर्यंत पोहोचू शकतात, तर दुधाचे दर १०० रुपये प्रतिलीटर का होऊ शकत नाहीत, असा सवाल करण्यात आला होता. त्यावरून देशभरात चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाला पत्रक प्रसिद्ध करून स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हरियाणामधील एका खाप पंचायतीने शेतकऱ्यांना तीन नवे कृषी कायदे आणि इंधनाच्या दरातील वाढीविरोधात १०० रुपये प्रतिलीटर दराने दूध विक्री करण्याचे आवाहन केले होते.   

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनmilkदूधIndiaभारत