नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या सव्वा महिन्यापासून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये होत असलेल्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला शेतकरी परेड काढणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शेतकरी संघटनेनं सरकारनं पुढाकार घेतला आहे. संघाची शेतकरी संघटना गावोगावी जाऊन नव्या कृषी कायद्यांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. नवे कृषी कायदे मागे घेण्याची गरज नाही. मात्र काही बदलांची आवश्यकता असल्याची भूमिका भारतीय किसान संघानं घेतली आहे.शेतकरी आणि सरकारमधील सातवी फेरी देखील निष्फळ; 8 जानेवारीला पुन्हा चर्चाशेतकऱ्यांकडे अद्यापही कृषी कायद्यांबद्दल पूर्ण माहिती नाही. अतिशय कमी शेतकऱ्यांना कायद्यांची कल्पना आहे. त्यामुळे भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते २६ जानेवारीला देशाच्या गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना जागरूक करतील, अशी माहिती भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय आयोजक सचिव असलेल्या दिनेश कुलकर्णी यांनी दिली. किसान संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत याबद्दलचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.
Farmers Protest: शेतकरी आंदोलन सुरू असताना संघ मोदी सरकारच्या मदतीला; २६ जानेवारीला गावोगावी जाणार
By कुणाल गवाणकर | Updated: January 4, 2021 22:31 IST