Farmers Protest: शेतकऱ्यांचे आज सामूहिक उपोषण; देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 03:56 AM2020-12-14T03:56:34+5:302020-12-14T06:58:14+5:30

तीनही कृषी कायदे सरकारने मागे घेण्याच्या मागणीवर ठाम

Farmers Protest Farmer leaders to observe hunger strike | Farmers Protest: शेतकऱ्यांचे आज सामूहिक उपोषण; देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

Farmers Protest: शेतकऱ्यांचे आज सामूहिक उपोषण; देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्राने केलेेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम असून, सोमवार, १४ डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शेतकरी संघटनांचे नेते सोमवारी सामूहिक उपोषण करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या सिंघू सीमेवर संयुक्त पत्रकार परिषदेत  नेते गुरनामसिंग चदुनी आंदोलनाची रुपरेषा मांडली. काही संघटना आंदोलन मागे घेत असून, कायद्यांना आमचा पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. मात्र, आमचा त्या संघटनांशी काहीही संबंध नसून सरकार कायदे मागे घेत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार चदुनी यांनी केला. सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून, सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. शहाजहाँपूर महामार्ग बंद करण्याच्या आंदोलनात हनन मोल्ला, डॉ.अशोक ढवळे, राजू शेट्टी, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव, सत्यवान, कविता कुरुगंटी, वेंकटरामय्या हे अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, तसेच आमरा राम, पी.कृष्ण प्रसाद, विजू कृष्णन, मेजर सिंह, सुरेंद्र सिंह, फुलसिंह शेवकंद, विक्रम सिंह, उषा राणी, मयुख विश्वास आणि इतर नेते सहभागी झाले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

उपमहानिरीक्षकांनी दिला राजीनामा 
आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी  शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. 

महामार्ग रोखला
जयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग शहाजहाँपूर येथे रविवारी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी बंद करून टाकला. इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत. 

Web Title: Farmers Protest Farmer leaders to observe hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.