शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 16:10 IST

शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत.

ठळक मुद्दे शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. या शेतकऱ्यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केलीमोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले

नवी दिल्ली -  शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले. तसेच भाजपा आणि संघाकडे निवडणूक जिंकण्यासाठी केवळ राम मंदिराचा मुद्दाच शिल्लक राहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकऱ्यांना संबोधित करताना येचुरी म्हणाले, ''नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडे आता केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा उरला आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी राम नामाचा जप सुरू केला आहे."  दरम्यान, राजधानीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली आहे.  यावेळी स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी ''नरेंद्र मोदी, किसान विरोधी'' हा नारा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा, असे आवाहन केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा आज संसदेवर धडकणार असून या पार्श्वभूमीवर संसदेच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा आक्रोश शेतकरी संघटनांचा आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी दिल्लीतील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कलाकार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. नेशन फॉर फार्मरच्या सहाशे ते सातशे स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांना साथ देत रामलीला मैदानाच्या दिशेने पायी कूच केली. यातील काही डॉक्टरांनी शेतकऱ्यांसाठी मैदानावर आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्लीPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह